उन्हाळी सुट्टी काळात कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांंना प्रमाणपत्र देण्यात यावे
शाळांची विद्युत देयके ग्रामपंचायतने भरावी
शिक्षक भारतीची मागणी
चिमूर,प्रतिनिधी – कोरोना महामारीत कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी चेक पोस्ट, संस्थात्मक विलगीकरण कक्ष,राशन दुकान आदी ठिकाणी जबाबदारी पार पाडली.शिक्षकांना दरवर्षी १ मे पासून सुट्ट्या असतात.या सुट्ट्यांच्या कालावधीतही अनुदानित,अंशतः अनुदानित, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असुनही या कालावधीत कोरोना आपात्कालीन व्यवस्थापन अंतर्गत विविध कामगिरी पार पाडली.सदर कालावधीमध्ये कोरोना कामगिरी केलेल्या शिक्षकांना कोविड ड्युटी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीने निवेदनातून जिल्हाधिकारी यांना तहसिलदार यांचे माध्यमातून केली.
जि.प.शाळांमधील विद्युत बिल घरगुती ऐवजी व्यावसायिक स्वरुपाचे करण्यात आले आहे.शाळांत दूरदर्शन,ई लर्निंग आदी शासनाचे उपक्रम सुरु असल्याने विजेचा वापर अधिक वाढला आहे.सध्या कोरोना महामारीत बहुतेक शाळांत संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले.
या कक्षात परराज्यातून,परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले.त्या सर्वांची योग्य सोय व्हावी म्हणून शाळेतील पंखे, दिवे, मोटर पंप उपलब्ध करुन देण्यात आले. अनेक शाळांमध्ये सातत्याने या विलगीकरण कक्षात नागरिक थांबले. त्यामुळे विजेचा वापर अधिक प्रमाणात वाढला.
परिणामी शाळांमधील विजेचे बिल मोठ्या प्रमाणात आले.याचा भूर्दंड शाळांना बसत आहे. त्यामुळे शाळेचे विद्युत देयके ग्रामपंचायतीनी भरावे या आशयाचे निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले.
चिमूर येथे विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,माध्यमिक जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर,जिल्हा सल्लागार धनराज गेडाम, चिमूर तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे,सचिव कैलाश बोरकर,आतिश गावंडे यांनी निवेदन दिले. ब्रम्हपुरी येथे तालुका अध्यक्ष राजेश धोंगडे, सचिव भाऊराव आठोळे,जिल्हा संघटक सतिश डांगे,जिल्हा सहसचिव परमानंद नंदेश्वर, प्रशांत घुटके, विलास दहिवले यांनी निवेदन दिले.
राजूरा येथे तालुका अध्यक्ष संजय बोबाटे, आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष बजरंग जेनेकर, जिल्हा उपाध्यक्ष विरेन खोब्रागडे,गिरीधर बोबडे, शालिक जुलमे यांनी निवेदन दिले.मूल येथे जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, छबन कन्नाके यांनी निवेदन दिले.
सुरगाण्यात आमदार.नितिन पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून मुक्या जनावरांची मुक्तता…….
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});