एकाच रुग्णवाहिकेतून 22 मृतदेहांची वाहतूक

बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार

0 599

बीड : अंबाजोगाई  येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामाथीर्थ रुग्णालयाची रुग्णवाहिका क्रमांक एमएच-२९/ एटी ०२99. मध्ये बॉडी पॅक लपेटून एकमेकांवर ठेवून रविवारी स्मशानभूमीत नेण्यात आले.

pune lok1

अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही येथे जास्त आहे. त्यामुळेच प्रशासनही ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी होताना दिसत आहे. येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच रविवारी दुपारी 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मृतदेह  रुग्णवाहिकेत कसे ठेवले असतील याचा अंदाज न बांधलेलच बरा.

जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला दोन रुग्णवाहिका पुरेशा नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रूग्णवाहिका देण्यात आल्या होत्या, सध्या दोन आहेत. वाढीव रूग्णवाहिकांसाठी आम्ही 17 मार्चला जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप रूग्णवाहिका मिळाल्या नाहीत, असं स्वाराती रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी रुग्णवाहिकेतून 22 मृतदेह ताब्यात घेण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अंबेजोगाईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल सादर करतील. या आश्चर्यकारक प्रकरणात जिल्हा प्रशासनाने एम्बुलेन्सचा अभाव हे एक कारण सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ शिवाजी शुकरे यांनी मंगळवारी सांगितले की, “रुग्णालय प्रशासनाकडे पुरेशा रुग्णवाहिका नाहीत, यामुळे ते घडले.”

 

error: Content is protected !!