एसबीआय बँकेला 2000 पिक कर्जाचे प्रस्ताव दाखल
एक महिना लोटूनही पीक कर्जाची रक्कम खात्यावर जमा न झाल्यामुळे शेतकर्यात नाराजीचा सूर
पालम, प्रतिनिधी – पालम येथील एसबीआय बँकेच्या वतीने जून महिन्याच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी प्रस्ताव तलाठी मार्फत मागवण्यात आले होते. परंतु एक महिना होऊन गेला तरीही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे रक्कम त्यांच्या खात्यावर न जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असताना दिसून येत आहे .शेतकरी अगोदरच सोयाबीनचे बोगस बियाणे न उगवल्यामुळे हवालदिल झाला असून बँकेच्या कासवगतीने काम करण्यामुळे अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याकरिता शेतकऱ्यांचे मंजूर झालेली पीक कर्जाची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बँकेकडे आतापर्यंत 2000हजार पीक कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले असून पैकी 500 प्रस्ताव शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी असल्यामुळे रिजेक्ट झाले आहेत व 500 प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरित 1000 हजार प्रस्ताव ची पडताळणी चालू आहे.
श्री बर्वे
शाखा व्यवस्थापक
एसबीआय बँक शाखा पालम
‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा
प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});