कपाशी किड व रोग एकात्मिक नियंत्रण

0 133

कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण या किडींचा; तर मर, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. वेळेवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

कपाशीवर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंडअळी, हिरवी/ अमेरिकन बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळी या तीन बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होतो. सद्यःस्थितीत बीटी कापसामुळे यांचे नियंत्रण करणे शक्‍य होत आहे; परंतु बोंडअळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

lok offer

1) तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) या किडींचा उद्रेक मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपाशीवर झाला होता.

2) बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांचाच वापर न करता इतर मशागतीय, यांत्रिक, जैविक पद्धतींचासुद्धा वापर करावा.

3) आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

tejgyan

कीड नियंत्रण व्यवस्थापनाचे टप्पे-
1. पेरणीपूर्वी
2. पेरणी करतेवेळी
3. पिकाचा कालावधी – 0-40 दिवस
4. पिकाचा कालावधी – 40-60 दिवस
5. पिकाचा कालावधी – 60-80 दिवस

पेरणीपूर्वी –
1) हंगाम संपल्यानंतर काडीकचरा वेचून नष्ट करावा.
2) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.

पेरणी करतेवेळी –

1) बीजप्रक्रिया – बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीड किंवा थायामेथोक्‍झाम (70 डब्ल्यूएस) पाच- सात ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया केलेली असते, त्यामुळे सुरवातीला 15 ते 20 दिवस रस शोषण करणाऱ्या किडींपासून संरक्षण मिळते.

2) रोग व रस शोषण करणारी कीड यांना प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाणांची लागवड करावी.

BT कपाशी पिकाचा कालावधी – 0-40 दिवस
संभाव्य प्रमुख किडी – मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, नागअळी*

सुरवातीच्या काळात इमिडाक्‍लोप्रीडचा वापर टाळावा.

नागअळीचे नियंत्रण असे कराल

नागअळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते,
त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
ही आळी पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात.
या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात.
त्यामुळे पुढे बोंडांचे पोषण होत नाही.

नियंत्रणासाठी निंबोळी अर्क चार टक्के किंवा २० मि.लि. ट्रायझोफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

अथवा

या किडीच्या नियंत्रणासाठी नुवान १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

पहिली फवारणी जेवढी लांबवता येईल, तेवढी लांबवावी, त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल.

रस शोषण करणाऱ्या किडींसाठी( मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण)

ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे.

किंवा

फोरेट (10 जी)

किंवा

फिप्रोनील (0.3 जी दाणेदार) 10 किलो प्रति हेक्‍टर याप्रमाणे जमिनीत ओल असताना झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने द्यावे.

किंवा

पाच टक्के निंबोळी अर्क

किंवा

निंबोळी तेल 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी यांचा वापर पीक 30 दिवसांचे झाल्यानंतरच करावे.

किंवा

खोडाच्या वरच्या बाजूस ऍसिफेट (75 टक्के)

किंवा

मोनोक्रोटोफॉस (36 टक्के) यांचे पाण्यातील द्रावण (1:4 प्रमाण) लावावे.

मित्र कीटकांना हानिकारक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

 

पिकाचा कालावधी – 40-60 दिवस

संभाव्य प्रमुख किडी – तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा).
* व्हर्टिसिलीयम लिकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
* थायामेथोक्‍झाम (25 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (20 टक्के) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)च्या व्यवस्थापनासाठी नोमूरिया रिलाई हा बुरशीजन्य घटक 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावा. अंडीपुंज व लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
* सुरवातीच्या काळात दुय्यम किडी जसे करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळ्या, केसाळ अळ्या इत्यादी कमी प्रमाणात आढळून येतात, त्यांच्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करू नये.

पिकाचा कालावधी – 60-80 दिवस –
संभाव्य प्रमुख किडी – फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी
* फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा क्‍लोथिनियाडीन (50 टक्के) एक ग्रॅम किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.

ओळखा रोगांचा प्रादुर्भाव –

मर –

* पाऊस जास्त झाल्यास निचरा योग्य नसल्यामुळे मुळांची क्रियाशीलता कमी होते, त्यामुळे पाने मलूल पडतात व गळतात.

* मर टाळण्यासाठी चिबड जमिनीत कापूस लागवड टाळावी.

* जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी सऱ्या काढाव्यात.

* प्रादुर्भावग्रस्त झाडांना त्वरित कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईडची 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

* रोगग्रस्त झाडांच्या खोडाभोवतीची माती पायाने दाबून घ्यावी.

दहिया –

* रोग आटोक्‍यात ठेवण्यासाठी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात वरील रोगाला पोषक परिस्थिती असल्यास वरचेवर पिकाची पाहणी करून रोग दिसून येताच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 30, 60 व 90 दिवसांनी फवारणी केल्यास रोगाचा चांगला प्रतिबंध होतो.

पानांवरील ठिपके (अल्टरोरिया) –

* वेळीच रोगट व गळालेली पाने वेचून जाळून टाकावीत.

* पेरणीपूर्वी बियाण्यास स्युडोमोनास फ्लुरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे जैविक प्रक्रिया करावी.

* या जैविक घटकाची (0.2 टक्के) फवारणी पेरणीनंतर 30, 60 व 90 दिवसांनी करावी, यामुळे जिवाणूजन्य करपा व ठिपके या दोन्ही रोगांचे नियंत्रण होते.

error: Content is protected !!