कमर्शियल टॅक्सी चालक-मालक हे ई पास काढून ट्रिप मारत असताना त्यांना १४ दिवस कोरनटाईन करण्यात येते, या कोरनटाईन पासून त्यांना न्याय द्या-मनसे
हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – संपूर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे अशातच राज्यात ४ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. जिल्ह्यातील कमर्शियल टॅक्सी वाहन चालक-मालक इ पास काढून ट्रिप मारते परंतु ट्रिप मारून आल्यावर त्यांना १४ दिवस कोरणटाईन राहावं लागते यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून आज दि. २-जुलै रोज गुरुवार ला मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व वाहतुक सेनेचे जिल्हासंघटक रमेश घंगारे यांचा नेतृत्वात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या मार्फत जिल्हाधिकारी भीमनवर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन च्या काळामध्ये टॅक्सी चालक ३ महिने घरीच होते आत्ता कुठे महिन्याला २-३ ट्रीपा माराला लागले तर त्यात १४ दिवस कोरनटाईन करण्यात येत आहे टॅक्सी चालकाला असंच कोरनटाईन करत गेल्यामुळे आज त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
एक टॅक्सी चालक एका ट्रिपमागे २ ते ३ हजार कमवितो लॉकडाऊन मुळे १-२ ट्रीपा मारतो त्यात टोल टॅक्स, डिझेल व इतर खर्च काढून तो महिन्याला २ ते २५०० कमवितो त्यात त्याचा कुटूंबाचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च, इलेक्ट्रिक बिल, व इतर खर्च यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल. त्यात आम्ही सर्व चालक-मालक शासनाच्या मदतीची सातत्याने वाट पाहत होत. पण शासनाने आमच्याकडे पाठ फिरवली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज टॅक्सी चालक व त्यांचे कुटुंब हवालदिल झाला आहे करिता आम्हा सर्व टॅक्सी चालक-मालकाला शासनाने तोडगा काढून मदत करावे व यातून न्याय मिळवून द्यावे।
यावेळी उपस्थित वा. सेना जिल्हासंघटक रमेश घंगारे, ता. संघटक जितेंद्र रघाटाटे, प्रज्वल पितळे, सागर बोबडे, अक्षय बाबूलकर, आकाश हुरले, शुभम लक्षणे, गोलू लडके, मयूर पुसदेकर,सौरभ गौळकर, अजय मुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.