करडगाव येथे आकाश प्रकाशराव भिसे पाटील यांच्या स्मरणार्थ घेतले रक्तदान व आरोग्य शिबीर

0 247

परभणी,दि 27 (प्रतिनिधी)ः
श्री संत खाजेबुवा देवस्थान पदयाञा कमिटी करडगाव ता.परभणी यांच्यावतीने शुक्रवारी (दि.27) शिवऐक्य आकाश प्रकाशराव भिसे पाटील यांच्या स्मरणार्थ  रक्तदान आणि आरोग्य शिबीर पार पडले.
श्रीक्षेञ श्रीसंत खाजेबुवा देवस्थान करडगाव येथे , परममित्र शिवऐक्य आकाश प्रकाशराव भिसे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
सकाळी खाजेबुवा यांची पुजा करून आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीराची सुरूवात झाली.
एकुण रक्तदान 100रक्तदात्यानी केले आणि तपासणी साठी 200-250रुग्णाची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
आजरोजी रक्ताची आवश्यकता पहाता रक्तदान एक जिवनदान या तत्त्वाला विचारात घेऊन आम्ही मिञाचा आठवणीत रक्तदान केले . एक रक्तदान यांचा फायदा किमान सहा आजारी लोकांना होतो यातून प्लेटलेसही उपलब्ध होते म्हणून आजच्या दिवशी रक्तदान घेऊन रक्तदान करण्याचेही आवाहण करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवचरण बीडकर , अमोल भिसे , संजय फुलझळके, रितेश जैन , गणेश मोरे , नंदकुमार भिसे ,नारायण खिस्ते, अनिकेत भिसे , मनोहर डोळसे, रूपेश देवडे, मारोती दामोदर , विठ्ठल दामोदर , बाळू मुंढे, स्पंदन देवडे , बाळासाहेब शिराळे,बबन भूरे ,दिपक बीडकर आणि खाजेबुवा पदयाञा कमिटी व खाजेबुवा मिञ मंडळ .

error: Content is protected !!