करोना प्रतिबंधक साहित्य देऊन खडक माळेगांवला दोन तरुणांनी साजरा केला वाढदिवस
निफाड,दि 13(प्रतिनिधी)ः
कोरोना च्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते व शिक्षणप्रेमी तरूण संतोष रहाणे यांनी वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा रायतेवस्ती, जि.प.शाळा खडकमाळेगाव, नुतन विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सॅनिटायजर , सोडिअम हायपोक्लोराईड , सर्व कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क भेट देण्यात आले.
१४ जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होणार आहे,परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात शाळा वर्ग कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे.विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या तरी कर्मचारी शालेय कामकाजा निमित्त शाळेत नियमित येत असतात तसेच ग्रामस्थांचेही कामानिमित्त शाळेत येणे जाणे असते म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट देण्यात आले.मागील शैक्षणिक वर्षातही शाळा बंद होत्या पण शिक्षकांनी अॉनलाईन,अॉफलाईन अध्यापन, प्रत्यक्ष गृहभेटी, स्वाध्याय उपक्रम, गल्ली मित्र, गट पध्दत यासारख्या पध्दतींचा वापर करून अध्यापन सुरू ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवले त्याबद्दल नुतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा रायते, जि.प.शाळा रायतेवस्तीचे मुख्याध्यापक गोरख देवढे यांचे जाणता राजा मित्रमंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी करत असलेल्या सेवेबद्दल आरोग्यसेविका श्रीमती. बेंडकुळे यांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.