कर्तत्ववान महिलाचा मर्दानी महाराष्ट्राची सन्मानपत्र देवून गौरव
रा.काँ. महिला आघाडीचा उपक्रम
माजलगांव, प्रतिनिधी – कोरोणाच्या पार्श्वभुमीवर विविध क्षेत्रात जिकिरीचे काम करत कर्तव्य बजावणार्यां महिला अधिकारी व कर्मचारी यांचा मर्दानी महाराष्ट्राची म्हणून सन्मानपत्र देवून गौरव राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या वतीने शोभा ठाकूर उपविभागीय अधिकारी, डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार.वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा झरकर, पोउपनि. निता गायकवाड, परिचारिका श्रद्धा गंगाधर घोगरे, अंगवाडी सेविका शामल रासवे माजलगांव. तसेच ग्रा.पं. संगणक आँपरेटर प्रतिनिधी म्हणून मिना बालासाहेब तौर. याचा जि.प.सदस्या मंगलाताई प्रकाश सोळंके,रा.काँ. महिला आघाडी च्या तालुकाध्यक्ष संध्या शरद भांडेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या २० व्या वर्धापन दिना निमीत्त माजलगांव तालुका महिला आघाडीच्या वतीने १२जुन शुक्रवार रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.