कर्तव्यावर हजर असणा-या पोलिस बांधवाना स्वखर्चातुन सॅनिटायजर, मास्कचे वाटप

0 179

आटपाडीच्या राहुल नवले यांची सामाजिक बांधिलकी

आटपाडी, प्रतिनिधी – संपुर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या मध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आटपाडी येथील तरूण युवक राहुल नवले यांनी स्वखर्चाने कंटनमेन्ट झोन मध्ये ड्युटी वर असलेल्या पोलिसांना सॅनिटायजर व मास्क वाटप केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस अहोराञ परिश्रम घेत आहेत. त्यांना ड्युटी वर असताना सुरक्षितेसाठी राहुल महादेव नवले यांनी स्वतः सॅनिटायजर व मास्क देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आटपाडी मधुन राहुल नवले यांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी राहुल नवले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

स्वतःच्या जीव धोक्यात घालून समाजासाठी सदैव सज्ज असलेल्या पोलिसांना सॅनिटायजर व मास्क देऊन राहुल नवले यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.



error: Content is protected !!