कर्मचार्यांना सक्तीने रजेवर घालवण्या मागचा एसटी महामंडळाचा उद्देश काय ?
बोरघर / माणगांव ,प्रतिनिधी – कोरोनाच्या लॉकडऊननंतर अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना सक्तीने २० दिवसाची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार करारातील एका मुद्द्याचा आधार घेत हा निर्णय लादण्यात आला. यामुळे महामंडळातील तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना वीस दिवस घरी बसावे लागणार आहे. या अंमलबाजावणीला एसटी महामंडळात सुरवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कामगार करार १९९६-२००० मधील खंड २२-१(ब) नुसार रा. प. महामंडळ व मान्यताप्राप्त संघटनेमध्ये समझोता झालेला आहे. सदर समझोत्या नुसार प्रत्येक वर्षात ४० दिवस पगारी रजा देण्यात येईल मात्र त्यापैकी निम्मी रजा कामगाराने दरवर्षी मंदीच्या मोसमात घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्थानिक प्रशासनाने सुचना फलकावर नोटीस लावून कळविले व संबंधीत कर्मचाऱ्यास रजेवर जाण्यासाठी मुक्त केले तर हा निर्णय कामगारांवर बंधनकारक राहील. उरलेली रजा त्यास पसंतीनूसार उपभोगता येईल.
तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातीळ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कामगार करार २०१६ -२०२० च्या नुसार वार्षिक वेतनवाढ २%वरून३%केली आहे तर घरभाडे ७% वरून ८ % केले आहे मात्र एस टी महामंडळाच्या प्रशासन कडून यावर अमलबजावणी होताना दिसून येत नाही त्यामुळे रा प कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळात तब्बल १ लाख ५ हजार कर्मचारी आहेत. या कामगारांच्या वेतनापोटी महामंडळाला प्रत्येक महिन्याला २४९ कोटी रुपये लागतात. कोरोनाच्या काळात वेतन कपात करु नये असे शासनाचे आदेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यावेच लागणार आहे. वीस दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जीत रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे.
असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय असा प्रश्न कामगार विचारत आहेत. एस.टी.कामगारांच्या वेतनासाठी शासनाकडे असलेल्या थकबाकीवर अवलंबून रहावं लागलं मार्च ७५% , एप्रिल १००% तर मे ५०% आणि जुन महीन्याची अद्याप कुठलीही हालचाल नाही त्यामुळे एस टी कामगारांवर उपासमारी ची वेळ येत आहे.
तर कर्मचाऱ्यांना आपला संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी गवंडी काम,बिगारी काम काहीजण पेट्रोल पंपावर काम करत आहे. अशी भयाण परिस्थिती एस टी महामंडळ मध्ये निर्माण झाली आहे. जर पून्हा एस टी सुरळीतपणे सुरू झाली नाही. कोरोना मुले कमी भूकमरिणी लोक जास्त मरतील अशी चर्चा कर्मचाऱ्यां मध्ये होत आहे तर एस टी महामंडळला नवसंजीवनी देण्यासाठी त्यासाठी राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. अशी कर्मचारी वर्गाची रास्त अपेक्षा आहे.
‘या’ दिवशी लागणार बारावीचा निकाल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});