कार्यक्षमता शिल भारतीय मातीत उदयास आलेला टेनिस व्हॉलीबॉल खेळ

0 186

आज १६ जुलै हा  जागतिक  टेनिस व्हॉलीबॉल (Tennis Volleyball) दिन  या खेळाचे जनक डॉ. वेंकटेश संतराम  वांगवाड  यांच्या जन्मदिना निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. या भारतीय मातीत उदयास आलेल्या या टेनिस व्हॉलीबॉल खेळावर (tennis volleyball game) दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.

खरंतर एका  सूक्ष्म  न दिसणाऱ्या विषाणूने  (कोविड  १९)  ने संपूर्ण  जगाला वेठीस धरले आहे. एकाच वेळेस अक्ख  जग  स्थब्ध व्हायची मानवी इतिहासातील  ही  पहिलीच वेळ म्हणावी लागेल. कोरोना  भौगोलिक सीमा नाही तो सर्व भागात, सर्व प्रदेशात सर्व शहर, गाव  अक्ख जग व्याप्त करून सोडला आहे. विकसित आणि पुढारलेल्या राष्ट्रांची अवस्था ना बोललेली बरी. त्या मानाने भारताने या  परिस्थितीचा सामना  खूप धीराने आणि व्यवस्थित केलेला आपल्यानं पाहायला मिळते. या आजारावरील लस  लवकर येणार नाही आजून किमान ६ महिने तरी नाही ये निश्चित झाले आहे. मग कोरोनासारखा आजरा होऊ नये म्हणून एकच पर्याय राहून, राहून आपल्या समोर येतो तो म्हणजे उरतो तो म्हणजे स्वतःची प्रतिकार शक्ती उत्तम ठेवणे. ती उत्तम ठेवण्या साठी चांगला आहार, उत्तम मानसिक स्वास्थ आणि नियमित खेळ आणि  व्यायाम  खुप महत्वाचे आहे. सध्याच्या लॉक डाउन च्या परिस्थितीत  बाहेर पडून खेळणं शक्य नाही पण रोज योग, सूर्यनमसाकार आणि प्राणायाम तर आपण करू शकतो. या परिस्थितीतुन जाग यशस्वीरित्या बाहेर पेडेलही यात काही शंका नाही.  आज १५० हुन अधिक औषध क्षेत्रातल्या बड्या कंपन्या संशोधन संस्था  कॉरोन लसीवर काम करीत आहेत काही लसीन च्या चाचण्या तिच्या अंतिम टप्प्यात आहेत.

अशी परिस्तिथी जगा समोर परत येणार नाही आस कोणीच ठामपने  सांगू  शकत नाही, त्या मुळे  भविष्यात  येणाऱ्या अशा परिस्थिती साठी शारीरिक तंदुरुस्ती आसने अत्यंत आवश्यक आहे.  मैदानी खेळ याला उत्तम पर्याय आहे. खरंतर लाऊन मुलानं  पासून मोठ्यानं पर्यंत आपण सगळे कुठ्यल्या ना कुठल्या तरी खेळाशी जोडलेलो  आसने  गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वज्ञ नुसार ५ ते १७  वयोगटापर्यंत  च्या मुलांनी रोज ६०  मिनिटे तरी खेळले पाहिजे आणि १८ ते ६४ वयोगटापर्यंत  किमान  एक आठवड्यात १५० मिनिटं  तरी शारीरिक क्रियाकलाप केला पाहिजे.
खेळणं मध्ये आलेल व्यासायिकीकरण बघता बऱ्याच पालकांचा ओढा त्या खेळांकडे जास्त बघायला मिळतो. पण सगळ्यांनाच सगळे खेल आणि त्याचे साहित्य आर्थिक दृष्टया परवडेलच असे नाही. असे काही खेळ आहेत की जे जास्त खार्चिक नाहीत आणि सहज खेळात येतात. टेनिस व्हॉलीबॉल असाच एक भारताच्या मातीत उदयास आलेला खेळ.

टेनिस व्हॉलीबॉल हा खेळ कोणालाही खेळात येऊ शकेल आसा हा खेळ आहे. बाकीच्या  काही  खेळांसारखा का खूप  खार्चिक नाही आणि एव्हाना ग्रामीण भागांमध्ये लोकप्रिय झालेला हा खेळ आहे. हा खेळ लोकप्रिय व्याहचे कारण म्हणजे खर्च  कमी पण  मनोरंजन, शारीरिक व्यायाम जास्त. या खेळाचे साहित्य म्हणजे  एक चेंडू, जाळी  आणि  खेळावयास लागणारे ८ X १६ चे मैदान. मैदान लहान आणि खेळाडू कमी त्यामुळे जलद हालचाली,  चेंडू मारणे, परतवणे या एकाच उद्देश मुळे खेळाडूला चपळतेने हालचाली कराव्या लागतात आणि त्यामुळे शरीराचे सर्व अवयवना यायाम होऊन कार्यक्षमता वाढते. या खेळावर आता पर्यंत  झालेल्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे कि या मुले कार्यक्षमता, एम्मुनिटी, लवचिकता सुधारते. कोणत्याही वयातील व्यक्ती हा खेळ खेळू  शकतात हि या खेळही जमेची बाजू आहे.

भारतामध्ये २४ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला आहे .आशिया अमेरिक मधील काही देशांमध्ये हा खेळ खेळ जातो. २०१४ मध्ये  या खेळाला  स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया ची मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत या खेळाया २१ राष्ट्रीय व ५ आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत. या खेळाचे प्रात्यक्षिक हे ऑलिम्पिक, प्री ऑलिम्पिक या मध्ये या खेळाची प्रात्यक्षिके सादर केली गेली आहेत.

वरती उल्लेख केला हा खेळ भारतात त्यातल्या त्यातण महाराष्ट्रात उदयास आला आहे. मराठवाड्यातील चाकूर जवळील आनंदवाडी याय गावात एका शेतकरी कुटंबात जन्मलेल्या व व्यवसायाने प्राध्यपक आलेले डॉ. व्यंकटेश संतराम वांगवाड या मराठी माणसाने या खेळाची निर्मिंती केली. अवघ्या २० वर्षात आहे खेळ संपूर्ण भारत भर खेळला जाऊ लागला. या खेळाच्या प्रथम राष्टीय स्पर्धा या १९९९ साली पुणे इथे पार पडल्या आणि तेव्हा पासून दर वर्षी या खेळाच्या विविध वयोगटातील स्पर्धा भारतभर होत आहेत.

आज प्रत्येक पालकांचे व विद्यार्थ्यांचे बहुदा एकच लक्ष आहे ते म्हणजे भरपूर अभयास, उत्तम गुण आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश. पण जर अंतर्मुख होऊन विचार केला तर खरंच यातून जीवनात सर्व साध्य होईल का, उत्तर बहुदा नकारार्थी असेल. कारण आताच्या परिस्थिती ला काय महत्वाचे वाटत आहे, तर ते म्हणे उत्तम आरॊग्या जेणे करून कोरोना कोरोना सारख्या रोग विरुद्ध सक्षम पणे लढता. तसं सर्वानाच व्यायाम करण्याची गरज केव्हा ना केव्हा तरी जाणवतेच. माग त्याची सवय फक्त आजार आला म्हणून ना लावता खेळ आणि व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य भाग व्हयला हवा.

लहान पासून ते मोठ्यान पर्यंत आजूबाजूच्या मैदानं वर जाऊन थोडा वेळ का होईना व्यायाम किंवा खेळ गेले पाहिजे. घराच्या आजू बाजूला मैदान नसले तरीसुद्धा मर्यादित जागेमध्ये केले जाणारे सूर्यनमस्कार, योगासने, एरोबिक्स आदी व्यायामप्रकार तरी नियमितपणे घेतले गेले पाहिजेत.

चार दिवसांपूर्वी भारताचे क्रीडा मंत्री श्री किरेन रिजिजू म्हंणाले की भारतीयां मध्ये क्रीडा क्षेत्राची जण कमी आहे. तसं बघायला गेला तर ते बर्याच प्रमाणात बरोबर आहे. कारण आजही समजा मध्ये खेळाकडे तुच्छतेने बघितल जात. खेळ म्हणजे विनाकारण वेळ वाया घालवणे असा आपण बऱ्याच वेळा ऐकतो. ही मानसिकता प्रथम बदलायला हवी आहे. त्यातल्या त्यात मुले आणि पुरुषांचे मैदानावरील प्रमाण बऱ्यापैकी चांगले दिसते त्या मानाने मुली व स्त्रियांचे मैदान वरील प्रमाण हे नगण्य आहे. आपल्याकडे खऱ्या अर्थाने खेळ संस्कृती आजून रुजली गेलेली दिसत नाही ती रुजवण्याची जवाबदारी पण सर्वांची आहे.

पुढे जाऊन कोरोना सारखे आजार येणार नाहीत अस आपण ठाम पाने सांगू शकत नाही ते आपल्या हातात नाही. पण स्वतःचे आरोग्य सदाकाळ उत्तम ठेवणे ही आपली वयक्तिक जवाबदारी आणि गरज आहे. टेनिस व्हॉलीबॉल हा एक त्या साठी चा उत्तम पर्याय होऊ शकतो असे मला वाटते.

लेखन:- डॉ. रितेश वांगवाड (पुणे) 99606 96577
गणेश माळवे (परभणी. 9423324907)



error: Content is protected !!