काही मनातले – वेळेचे महत्व
लहानपणी सकाळची शाळा असल्याने लवकर उठावे लागायचे. कधी कधी खुप कंटाळा व राग यायचा पहाटे उठायला. पण आई रोज लवकर उठवताना प्रेमाने हाक मारायची व तिच्या गोड आवाजाने झोप पळुन जायची. आणि ती सकाळी लवकर उठायची सवय किती आवश्यक होती याचे महत्व वेळेचे नियोजन करताना आयुष्यभर उपयोगी पडले व पडत आहे.
साठ सेकंदाचा मिनीट, साठ मिनीटांचा तास व चोवीस तासांचा एक दिवस हे गणित न चुकणारे आहे. जे प्रत्येकास समान आहे. पण आपण आप आपल्या स्वभाव, आवड, सवड, विचार, संकल्प, स्वप्न या सा-यांच्या गराड्यात वेळ या केंद्रबिंदुस गृहीत धरले तर ते विकास व प्रगतीत सहाय्यक बनेल याची शाश्वती नाही. वेळेची जाण व तिचे महत्व माणसाला ख-या अर्थांने यशस्वी बनवते. कारण आयुष्यात काही मिळवायचे असेल तर योग्य निर्धार व मेहनत जसे आवश्यक आहे त्यापेक्षा वेळेचे नियोजन फार गरजेचे आहे.
जीवनात कोणतेही काम वेळेत केले तर त्यापासून मिळणारे फळ हे नेहमीच चांगलं असते. संत कबीर दास यांनी म्हटलं आहे की,
काल करे सो आज कर, आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी, बहुरि करेगो कब।।
‘उद्या करायची काम आज करा आणि आज करायचं आता’. या अनुषंगाने आपण वागून आपली सर्व कामे याचं प्रकारे केली तर भविष्यात कुठलीच चिंता करायचं काम पडणार नाही.
आज प्रत्येक कामासाठी आपणास धावाधाव करावी लागते कारण आजचे युग खूप धावपळीचे युग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाची धावपळ सुरूच असते. अश्या वेळी कामाचे नियोजन करणे खूप गरजेचं असते. वेळेचे योग्य नियोजन करून काम केल्याने प्रत्येक काम वेळेत पूर्ण होते.
जीवनात सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ होय. वेळेचा नेहमीच सदुपयोग केला पाहिजे, पैसे खर्च केले तर पुन्हा कमवता येतात पण गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही. म्हणून आपल्या जवळ असणाऱ्या वेळेचा योग्य तऱ्हेने वापर करून घेतला पाहिजे.
जयपूरला असतांना एकदा स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्
त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले.
`केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते. आणि त्या करीता वेळेवर प्रयत्न करणे तेवढेच आवश्यक आहे.
” समय मुफ्त में मिलता है, परंतु यह अनमोल है। आप इसे अपना नही सकते, लेकिन आप इसका उपयोग कर सकते हैं। आप इसे रख नही सकते, पर आप इसे खर्च कर सकते हैं। एक बार आपने इसे खो दिया, तो वापस कभी इसे पा नही पाएंगे।” ~हार्वे मैके
वेळ ही कायम आपल्या सोबत असते. पण आपली स्वत:ची ओळख बनवायची असेल तर वेळेचे महत्व व नियोजन फार आवश्यक आहे. असे म्हणतात की हातातली वाळू काही वेळे नंतर निसटु लागते तसेच वेळेला जर आपण जखडुन किंवा थोपवुन ठेवले तर ती वाळु सारखी निसटुन जाते. आणि गेलेली वेळ परत कधीच येत नाही.
वेळ ही कोणासाठी कधीच थांबत नसते, त्यामुळे जे तिच्यासोबतीने प्रवास करतील तेच आपल्या जीवनात यशस्वी होतील. जे जे व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यास जाणवेल की कसे काय ते इतके यशस्वी झाले.
आपल्या समाजात दोन प्रकारची माणसे आहेत, एक म्हणजे जी माणसे वेळे नुसार आपली सर्व कामे करतात आणि दुसरी म्हणजे ज्यांना वेळेचं काहीच भान नसते ते आपल्या विचारातच मग्न असतात. अश्याप्रकारची माणसे त्यांच्या जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. मानवाने वेळेचं महत्व जाणलं पाहिजे, वेळेसारखी दुसरी कोणतीच वस्तू मौल्यवान नाही आहे. एक वेळ पैसा गेला तरी माणूस तो पुन्हा मिळवू शकतो परंतु, वेळ एकदा का निघून गेली तर, ती परत कधीच मिळवता येत नाही.
म्हणुनंच वेळ वाया दवडण्यापेक्षा प्रत्येक मिनीटाचे नियोजन केले की वेळेची ही आपल्याशी मैत्री होते व हीच मैत्री आयुष्याला चांगले दिवस व आनंद, समाधान बहाल करते.
ज्योती कुलकर्णी, मुंबई