कृषीकन्या दिशा चौंडकर आपल्या गावातच करत आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0 121

पुरंदर – महाराष्ट्र राज्यात कृषी विद्यापीठा अंतर्गत शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन करीत असतात.यावेळी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील कृषिकन्या कु दिशा चौंडकर या विद्यार्थिनीने महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी,तळेगाव दाभाडे, (ता.मावळ) या महाविद्यालया अंतर्गत कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येत असुन तिने मका या पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळत असल्याचे तीने निरीक्षण केले.त्यावर उपाय व शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून तीने मका या पिकावर प्रात्यक्षिक करण्याचे ठरवले. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस जास्त प्रमाणात आढळत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.एकात्मिक पद्धतीने आपण या किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो जसे की रासायनिक बदल,यांत्रिकी बद्दल,जैविक पद्धत,मशागत पद्धत या पद्धतीने आपण या किडींचा नायनाट करू शकतो असे दिशा चौंडकर हिने सांगितले.यावेळी सीमा भरत चौंडकर,रोहिणी देविदास चौंडकर उपस्थित होत्या.हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी तिला कॉलेजच्या प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले व इतरही सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सांगितले.

error: Content is protected !!