केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी अॅड. आकाश ठोळे तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. कसबे यांची नियुक्ती
वैजापूर, प्रतिनिधी –केंद्रीय पत्रकार संघाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या विधि व न्याय विभागाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी अॅड. आकाश ठोळे तर संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. आबासाहेब कसबे, वैजापूर तालुकाध्यक्षपदी संजय पगारे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती ही केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप कसालकर यांचे निर्देशानुसार तर राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी श्री कमलेश गायकवाड यांचे आदेशानुसार तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब कसबे, उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या प्रस्तावानुसार करण्यात आली असून उर्वरित तालुका कार्यकारिणी पुढीप्रमाणे:-
उपाध्यक्ष सूधीर बागूल, कार्याध्यक्ष सचीन कूमावत, तालुका प्रभारी शेख अजहर, संघटक तुषार पवार, सहसंघटक मतीन शेख, तालुका महासचिव सौरभ लाखे, सचिव नईम शेख, तर तालुका संपर्कप्रमुखपदी खाॅजा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीतर्फे स्वागत करण्यात आले.
प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});