कोकणखेडे येथे शिंदे कुटुंबीयांनी गरिब जनतेला केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0 270

दरेगाव – चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथील शिदे कुटुंबाने सध्याच्या संकटकाळी माणुसकी जपत गावातील गोरगरीब जनतेला धान्य व ईतर किराणामालाची वाटप केली.
चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथील एकञीत असलेले शिंदे कुटूंबीयांनी कोरोना विषाणू व्हायरस मुळे लॉकडाऊन असल्यामुळे जागोजागी गोरगरीब जणतेची खाण्यापिण्याची फार बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. गरीब जणतेच्या हाताला काम नाही व त्यांची उपासमारी होत आहे. त्यामुळे कोकणखेडे येथील एकञीत कुटूंब दत्तात्रय ञ्यबंक शिंदे.,कारभारी शिंदे,नामदेव शिदे यांनी ह्या गरिब जणतेची हाल बघुन त्यांनी आपल्या स्वताच्या शेतातील प्रत्येकी गव्हू सात किलो गोडेतेल एक किलो व साखर एक किलो असे १००ते सव्वाशे लोकांना देण्यात आले. त्यावेळी कोकणखेडे येथील माजी सरपंच समाधान पाटिलबा शिंदे यांनी त्यांच्या भावांचे आभार मानले.तसेच दत्तात्रय शिदे यांनी मला गावातील त्या गरिबी लोकांचे लॉकडाऊन असल्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची हाल बघितली जात नव्हती म्हणून मी माझ्या भावाना सांगून त्यांना दोन चार दिवस पुरेल असे अन्य देण्याचा निर्णय घेतला आहे. . यावेळी वेळी कारभारी शिंदे यांनी हा कोरोना व्हायरस लवकर आपल्या देशातूनच जावा म्हणजे या गरिब जणतेची हाल होणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी सरपंच सोनाली दादा माळी, उपसरपंच बबन शिंदे, पोलीस पाटील बबन खेमनार यांच्यासह कोकणखेडे येथील नागरिक उपस्थितीत होते.

error: Content is protected !!