कोटंबवाडी जि.प.मध्ये शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न

सहारा सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत कार्यालय यांचा उपक्रम

0 206

परभणी,दि 05 (प्रतिनिधी)ः
परभणी तालुक्यातील कोटंबवाडी येथील जि.प. शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला . याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय आणि सहारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसह इतर कर्मचारी यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेणुकाताई जोरवर तर प्रमुख पाहुणे उपसरपंच शेषराव वाघ, माजी सरपंच मीनाक्षी रामचंद्र शिंदे, आशाबी कुरेशी,आयोजक भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबा पठाण, रामचंद्र शिंदे,युवा नेते गजानन जोरवर,शा.स.अध्यक्ष अर्जुन जोरवर, भारत घोडके, बाबूराव राठोड, मुंजाभाऊ इचनर, विठ्ठल एलकेवाड आदिंची उपस्थिती होती. यावेळी सत्कारमूर्ति म्हणून तलाठी ए. व्हि.आळसे , कृषि सहाय्यक विनोद जोशी ,तलाठी के.एस.चव्हाण, मुख्याध्यापक अशोकराव यादव ,रामप्रसाद अवचार, श्रीमती संगीता चौधरी ,रंजना कुलकर्णी, श्रीमती लता इंगळे, नारायण बनसोडे, श्रीमती मीरा कानडे, राम बायस, अंगणवाडी ताई प्रियंका लबडे ,नवनाथ गायकवाड, नारायण एलकेवाड , महानंदा बोनेवाड, शालुबाई एलकेवाड, सत्यभामा एलकेवाड, अंबिका पालटवाड, आदींचा शाल,श्रीफळ, सन्मानपत्र,पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. प्रस्ताविकातुन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबा पठाण यांनी कार्यक्रमामागील भूमिका विषद केली.सूत्रसंचालन गोविंद एलकेवाड तर आभार रामचंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठि अशोक जोरवर,मुंजाभाऊ इचनर, विठ्ठल एलकेवाड,संभाजी इचनर, सागर जोरवर, रुख्मीनबाई जोरवर,आतिश राठोड आदिसह कोटंबवाडी ग्रामस्थ अदिनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!