कोरोनाची भिती ही सापासारखी :- सर्प मित्र प्रकाश भैय्या गायकवाड
सातारा – महाराष्ट्रात 90 टक्के साप हे बिनविषारी आहेत तरीही साप चावला की त्या धक्क्यानेच माणसाचा मृत्यू होतो तसेच काहीसे आज कोरोना बाबत झाले आहे त्यामुळे कोरोना झाला तरी घाबरून जाऊ नका,असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा.प्रकाश भैय्या गायकवाड यांनी जनतेला केले आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश भैय्या म्हणाले की, सापाची भितीच इतकी असते की एकदा तो चावला की मग तो विषारी होता की बिनविषारी होता हेही कोणी पाहत नाही ज्याला चावला तो घाबरून जातो आणी बरेचदा त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू होतो म्हणजे सापाचे विष नव्हे तर भीती हे मृत्यूचे कारण ठरते तसेच कोरोनाचे झाले आहे मृत्यू होणाऱ्यांमध्ये भीती व धक्क्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे मात्र त्यातून बरे होण्याचे प्रमान 97 टक्के आहे त्यामुळेच घाबरण्याचे कारण नाही सकारात्मक विचारसरणी, योग्य आहार, पुर्ण झोप लक्षाणानुरूप औषधोपचाराने हा आजार पुर्ण बरा होऊ शकतो. हा आजार होऊच नये यासाठी गर्दीचे ठिकाणे टाळावी वारंवार हात धुवावे सुरक्षित वावराचे पालन करावे सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवली पाहिजे त्याच प्रमाणे गरम पाण्याची वाफ, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. आपल्यात काही लक्षणे आढळल्यास किवा रूग्नांच्या संपर्कात आल्यास घाबरून न जाता स्वतःला विलगीकरणात ठेवावे व चाचणी करून त्यानुसार गरज असेल तर औषधोपचार सुरू करावा आपन घाबरलो तर त्यामुळे रक्तातील साखर व रक्तदाब यात वाढ होते त्यामुळे घाबरायचे नाही फुफ्फूसांना बळ मिळेल असा हलका व्यायाम करावा बाधित झाल्यास विश्रांती घ्यावी या आजारात ऑक्सिजन पातळी कमी होते असे आढळून आले आहे त्यामुळे रुग्णाने पोटावर झोपावे असे केल्यास फुफ्फूसाच्या सर्व कप्प्यांमध्ये हवेचा संचार होतो व ऑक्सिजन पातळी चांगली राहते असे सर्प मित्र प्रकाश भैय्यांनी सांगितले आहे.