कोरोनामुळे शाळा बंद…पण शिक्षण सुरू

0 297

कन्नड मधील साने गुरुजी विद्यालय या प्रयोगशील शाळेचा स्तुत्य उपक्रम; शाळा बंद काळात ऑनलाईन अध्यापन अन् अध्ययनास प्राधान्य

“विद्यार्थ्यांनी मोफत शिक्षणाचा लाभ घ्यावा- उपक्रमशील शिक्षक शिवराज पाटील”

कन्नड, प्रतिनिधी – सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने सर्वच शाळा बंद आहेत. परंतु साने गुरुजी विद्यालय कन्नड येथे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे तेही शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून. लॉकडाउनच्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत हा मुख्य हेतू लक्षात घेऊन आम्ही आमच्या गुरू सह्याद्री यूट्यूब चैनल द्वारे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

प्रत्येक पालक ऑनलाईन क्लास लावू शकत नाही, ऑनलाइन क्लासची फीस ही भरपूर मोठ्या प्रमाणात जास्त असते. त्यामुळे प्रत्येक पालक फी भरू शकत नाही. त्यामुळे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मिलींद पाटील, सचिव तात्याराव कदम यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याध्यापक धैर्यशील केरे,भगवान ठाकरे, श्रीमती अस्मिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे शिक्षक शिवराज पाटील यांच्या संकल्पनेतून जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक आमच्या यूट्यूब चैनल मार्फत मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामध्ये प्रथमतः इयत्ता सहावी, सातवी, आठवी या तीन वर्गांचे इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय शिकवण्यात येणार आहे. यासाठी नितीन पाटील, रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मोफत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी https://www.youtube.com/c/ShivrajDharmarajpatil या युट्युब लिंकचा उपयोग करावा असे उपक्रमशील शिक्षक शिवराज पाटील त्यांनी म्हटले आहे.

READ MORE – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट
READ THIS – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!