कोरोना बांधित व्यक्तीला दोन लाख तर मृत्यु व्यक्तीस सात लाख रुपये देण्यात यावे – बाबासाहेब पगारे
वैजापूर,विलास म्हस्के-संपुर्ण महाराष्ट्रात आज कोरोना सारख्या महामारीने अनेक कुटूंब उध्वस्त झाली अनेक बाधित झालेले असून व अनेक जण मरण पावले आहे अशा सर्व लोकांना शासनाने बाधित झालेल्या लोकांना दोन लाख व प्रत्येक व्यक्तीस देण्यात यावे व मृत्यू व्यक्तीस सात लाख रु देण्याची तरतुत करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात पुढे संपुर्ण देश भरात आज घडीला कोविड-१९ सारख्या आयात करण्यात आलेल्या आजाराने थैमान घातलेले असुन त्यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त झाले अनेक कुटूंब रोडवर अली अनेक लोक बाधित झाले या सर्व लोकांना शासनाने मदत करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली तर नसता येणाऱ्या काळात बहुजन समाज पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल व पुढील सर्व प्रकरणास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील असे नमूद केले आहे तर या निवेदनावर बाबासाहेब पगारे,ऋषिकेश त्रिभुवन,मेघराज त्रिभुवन,राहुल साळवे,वाल्मिक पठारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
BREAKING: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयटी अॅक्ट 2000 च्या अंतर्गत भारतात 59 चीनी अॅप्सवर बंदी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});