कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अस्थायी कर्मचारी वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार – नोकरवर्ग चिंताग्रस्त

0 86

माणगांव, विश्वास गायकवाड – देशभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी खंडीत करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून शासनाला कठोर भूमिका घेऊन प्रसंगी नाईलाजाने लाॅकडाऊन प्रक्रियेत वारंवार वाढ करावी लागत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशाती सर्व प्रकारचे आणि सर्व ठिकाणचे व्यापार, उद्योग धंदे बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी सदर नोकरी, व्यापार, उद्योग धंद्यांच्या अस्तित्वावर ज्या नोकर वर्गाच्या नोकर्या व सदर नोकरीच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात, अहमदाबाद, सुरत आदी ठिकाणी नोकरी धंद्या निमित्त स्थायी अस्थायी स्वरूपात दहा बाय दहाच्या खोलीत कौटुंबिक चरितार्थ चालवत आपल्या कुटुंबा समवेत जीवन कंठणार्या सरकारी निमसरकारी अस्थायी कर्मचारी व मजूर, वेठबिगार वर्गाचे पगार संबंधित कंपनी व्यवस्थापनाने रोखले आहेत.

लाॅकडाऊन संचारबंदी मुळे देशातील छोटे मोठे उद्योग, नोकरी धंदे बंद असल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचारी वर्गाचे पगार रोखले आहेत. पगार रोखल्या मुळे सर्व कर्मचारी वर्गावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे कर्मचार्यांच्या, मजूरांच्या घरात जीवनावश्यक वस्तू नाहीत, अन्न धान्य नाही, पोटाची भूक शमविण्यासाठी खिच्यात पैसे नाहीत अशी अवस्था मोलमजुरी करणार्या मजूर व नोकर वर्गाची झाली. त्यामुळे त्यांच्या समोर एकीकडे कोरोना विषाणूचे संकट तर दुसरीकडे भूकमारीचे संकट उभे ठाकले. अशा द्विधा अवस्थेत अडकलेला सर्व ठिकाणचा चाकरमानी या जीवघेण्या गंभीर परिस्थितीला कंटाळून नाईलाजाने जीवावर उदार होऊन आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला.

कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे देशातील केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या सेवा व परिवहन सेवा बंद असल्याने परिणामी या चाकरमानी मंडळींना आपल्या लहान लहान लेकरांसह जीव जगवण्यासाठी गावाकडे जाण्याच्या इर्षेने आपापल्या नोकरी धंद्या च्या ठिकाणा पासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपापल्या गावाकडे जाण्यासाठी उपाशीपोटी रखरखत्या उन्हातून शेकडो, हजारो किलोमीटरची जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. या खडतर प्रवासा दरम्यान अनेकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला. तर काहींनी मिळेल त्या वाहनाला हात करून ट्रक, टेम्पो, डंपर, रुग्णवाहिका, सिमेंट मिक्सरमधून बेकायदेशीर जीवघेणा प्रवास करून कसेबसे आपले गाव गाठले. तिथे गेल्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक खबरदारी म्हणून आजूबाजूच्या शाळांमध्ये कोरोंटाईन केले. तिथेही त्यांची राहण्या खाण्याची प्रचंड परवडच झाली. एवढे सर्व अग्नी दिव्य करून स्वगृही परतलेल्या चाकरमानी मंडळींना जीवनावश्यक वस्तूंच्या भीषण समस्येमुळे उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे गावात कोणत्याही प्रकारचे रोजगाराचे साधन नसल्याने त्यांची आगीतून फुफाट्यात अशी अवस्था झाली आहे. त्याच बरोबर वाढत्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे बंद झालेले उद्योग, नोकरी, धंदे पुन्हा चालू होणार की नाही. आणि जेव्हा कधी चालू होतील तेव्हा तिथे पुन्हा आपल्यालाच कामावर घेतील याची शाश्वती नाही. त्यामुळे तमाम चाकरमानी मंडळींना आपल्या नोकर्या गमावण्याची भीती भेडसावत आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे हा नोकर वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

error: Content is protected !!