खंडाळा येथे विनाकारण फिरणाऱ्यांना चोप

0 120

खंडाळा, प्रतिनिधी – लॉक डाऊन दरम्यान काही काम नसताना विनाकारण मोटरसायकल वर चकरा मारणाऱ्यांना पोलिसांनी चांगला चोप दिला. सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले असताना काही महाभाग विनाकारण घराबाहेर पडत आहे पोलीस कर्मचारी वारंवार सूचना देऊनही न ऐकणाऱ्यांना पोलिसांनी आज चांगला चोप दिला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस कर्मचारी व प्रशासन नागरिकांना घरातच राहण्याचा व अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावे नसता घरातच राहण्याच्या सूचना देऊनही काही नागरिक सूचनांकडे कानाडोळा करत असून कायद्याचे उल्लंघन करत आहे. अशा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!