खळबळजनक… बीडमध्ये तिहेरी हत्याकांड; महिलेसह दोन मुलांची हत्या
बीड, प्रतिनिधी – शहरातील शुक्रवार पेठेतील तकवा भागात एकाच कुटूंबातील तिघांचा खुन झाल्याची घटना आज रविवारी (दि.२४) दुपारी समोर आली. पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांचा खून केल्याचा संशय आहे. पती स्वत:हून पेठ बीड ठाण्यात हजर झाला आहे.
संगीता संतोष कोकणे (३१), संदेश संतोष कोकणे (१०), मयुर संतोष कोकणे (७, सर्व रा.तकवा, शुक्रवारपेठ, बीड) अशी मयतांची नावे आहेत. तर संतोष कोकणे संशयित आरोपीचे नाव आहे. संगीता कोकणे व त्यांचा मुलगा संदेश कोकणे या दोघांचे मृतदेह घरात तर सात वर्षीय मयूरचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला. माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड ठाण्याच्या घटनास्थळी धाव घेतली.चारित्र्याच्या संशयावरून तिहेरी खून प्रकरण घडले असल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान संतोष कोकनेला पोलीसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले.
…हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 14 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 36
बीड जिल्हा : आणखी सहा पॉझिटीव्ह