खळवट लिंमगाव शिवारात १७ हजाराची गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0 115

वडवणी, धनंजय माने – वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव पासून २ कि.मी.अंतरावर माजलगांव धरणा जवळ अवैध गावठी दारू बनवुन या परिसरातील गावात विक्री करण्यात येत असल्याची तक्रार सरपंच पती भारत निसर्गण यांनी केल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड व भरारी पथक बीड यांनी काल दि.२४ शुक्रवार रोजी धाड मारून भट्टी उध्वस्त करून गावठी दारू बनविण्याचे ६०० लिटर रसायन व २५ लिटर दारु जप्त करून अड्डा नष्ट केल्याची कारवाई केली आहे.


सध्या कोरोना विषाणू मुळे बंद असताना तालुक्यातील खळवट लिंमगाव शिवारातील २ कि.मी.अंतरावर माजलगांव धरणा जवळ गावातीलच काही जण गावठी हातभट्टी दारू भट्टी करून तयार करून या परिसरातील खळवट लिंमगाव, देवडी यासह इतर गावात विक्री केली जात होती अशी तक्रार सरपंच पती भारत निसर्गण यांनी वडवणी येथील तहसील कार्यालयातील बैठकीत गेल्या दोन दिवसा पुर्वी माजलगांव येथील उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर व सुरेखा स्वामी तहसीलदार यांच्या कडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आधिक्षक नितीन धार्मिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरिक्षक बीड व दुय्यम निरीक्षक माजलगांव निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
भरारी पथक, बीड.वदुय्यम निरीक्षक, माजलगांव आर.डब्लू. कडवे, दुय्यम निरिक्षक वाय.एस.व्हनमारे, घोरपडे साहेब, जवान आर.ए.जारवाल, मस्के, मोरे, एस.जारवाल यांच्या समावेश होता. यांनी काल दि.२४ शुक्रवार रोजी धाड मारून रसायन-६०० लि., हातभट्टी:-२५ लि. ज्याची अंदाजे किंमत १६५५० रुपयांचा माल जप्त करून गावठी दारू बनविण्याचे टिपाड, दारूचे प्लास्टिक कॅड नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

error: Content is protected !!