खाजगी बसचालकांची उपासमार थांबवा-संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
माजलगांव, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी बस प्रवासी चालकांची उपासमार सुरू असून याबाबत सरकार आणि गाडीमालकांनी त्वरित उपाययोजना करून मदतीचा हात देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्रवासी बसचालक संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने माजलगांव तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उद्योगधंद्यांची वाताहत झाली असून खाजगी बसचालक पूर्णपणे भरडून गेले आहेत. दळणवळणाची महत्त्वपूर्ण सेवा बजावणारे चालक उपासमारीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे खाजगी बस चालवण्यासाठी शासनाने त्वरित परवानगी द्यावी. प्रसंगी कोरोनाने मृत्यू झाल्यास सुरक्षा कवचही देण्यात यावे, शासनाने घालून दिलेले सर्व कोरोना संदर्भातील नियम लागू करण्याचे नियम संबंधित बसमालकांना देण्यात यावेत. बसचालकांना तुजपुंजा पगार असतो त्याबाबतही विचार करावा. निवेदनावर वसंत सुरवसे, अभिजित देडे, छगन काळे, नितीन कोकाटे, बळीराम भिसे, रघु थोरात, शेख अहेमद, रमेश थावरे, सुरेश सोळंके, अंगद देशमुख, आबासाहेब शेजुळ आदींच्या सह्या आहेत.
READ MORE – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट
READ THIS – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?