खा. सातव यांच्या वाढदिवसानिमित गंगाखेडला कोरोना योद्ध्यांचा गौरव
गंगाखेड, प्रतिनिधी – कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार ॲड राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड येथे कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. तालुका कॉंग्रेसच्या वतीने गोविंद यादव यांनी या ऊपक्रमाचे आयोजन केले होते. तहसीलदार स्वरूप कंकाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत आणि कोरोना योद्ध्यांचा गौरव असे सामाजीक ऊपक्रम राबवण्याचे आवाहन खा. सातव यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत गंगाखेड तालुका कॉॅंग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. गंगाखेड येथील आयटीआय सेंटर येथील कोविड तपासणी केंद्रातील प्रमुख तपासणीस प्रविण जायभाये यांचा फेटा बांधुन तर डॉ. योगेश मलुलवार, डॉ. वसिम शेख, मनोज नाव्हेकर, राजकुमार फड, संतोष मुंडे, ज्ञानेश्वर गुट्टे, अतुल तुपकर यांचा शाल – श्रीफळ आणि पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. तसेच कस्तुरबा गांधी शाळेतील कोविड विलीगीकरण केंद्रातील डॉ. कांचन कांगणे, ईंचार्ज तक्षशीला वाघमारे, अश्विनी प्रधान, सुमेधा नागरगोजे, शफी शेख, खाजा शेख, बापु चव्हाण, एमपीडब्ल्यू वाघमारे आदिंचा पुष्पहारांनी सन्मान करण्यात आला. कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, त्यांचे सर्व सहकारी, नगर परिषद कर्मचारी आणि विविध कोरोना योद्ध्यांप्रती तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. युवा नेते सुशांत चौधरी, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, विधानसभा सचिव, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव आदी या प्रसंगी ऊपस्थित होते. शुभम भिसे, अजय कुकाले, प्रदिप चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.