गुगल क्लासरूम विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद

0 125

पुणे,प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या युगात उपयोगी पडणाऱ्या ‘ अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत गुगल क्लासरूम चा उपयोग’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते .

१४ जून रोजी हा वेबिनार झाला . प्रा. राणी पोटावळे, रजत सय्यद, प्रा. प्राजक्ता जगताप, स्वप्नील दौंडे यांनी मार्गदर्शन केले.

जीमेल द्वारे गुगल क्लासरुम चा वापर, अद्यापनाच्या साहित्याची निर्मिती, ऑनलाईन प्रश्नपत्रिकांची निर्मिती, तपासणी, ब्रेन स्टॉर्मिंग गेम्सची निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य आणि वेबिनारच्या संयोजक डॉ. किरण भिसे यांनी आभार मानले.

कर्तव्यावर हजर असणा-या पोलिस बांधवाना स्वखर्चातुन सॅनिटायजर, मास्कचे वाटप

 

error: Content is protected !!