गुगल क्लासरूम विषयावरील वेबिनारमध्ये २०० सहभागी

0 139

पुणे,प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या युगात उपयोगी पडणाऱ्या ‘ अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत गुगल क्लासरूम चा उपयोग’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते .विविध राज्यातून २०० प्राध्यापक सहभागी झाले.

१४ आणि १७ जून रोजी हा वेबिनार झाला . प्रा. राणी पोटावळे, रजत सय्यद, प्रा. प्राजक्ता जगताप, स्वप्नील दौंडे यांनी मार्गदर्शन केले.

संयोजक डॉ किरण संजय भिसे म्हणाल्या ,’अध्यापनाला तंत्रज्ञान हा पर्याय होऊ शकणार नाही. मात्र,कोरोना सारख्या संकट काळात या तंत्रज्ञानाची मदत शिक्षण कार्यात होत आहे. भविष्य काळ आणखी आव्हानात्मक असून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी नव्या शिक्षण प्रणालीची कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत’.

जीमेल द्वारे गुगल क्लासरुम चा वापर, अद्यापनाच्या साहित्याची निर्मिती, ऑनलाईन प्रश्नपत्रिकांची निर्मिती, तपासणी, ब्रेन स्टॉर्मिंग गेम्सची निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य आणि वेबिनारच्या संयोजक डॉ. किरण भिसे यांनी आभार मानले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर चिमूर तालुक्यात भ्रष्टाचार

 

error: Content is protected !!