गोदावरीचे पाणी मोरेश्वराच्या पायरीला ढालेगाव बंधाऱ्याचे एक गेट उघडले
८ हजार ८२५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
माजलगांव, प्रतिनिधी:- अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच जून महिन्यात मॉन्सून वेळेवर आणि योग्य प्रमाणात बरसत आहे . जिल्ह्याभरात पावसाने मागील १५ दिवसांच्या काळात दमदार हजेरी लावली त्यामुळे गोदावरी नदीवर असलेल्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे बंधारा ९६टक्के भरल्यामुळे बंधाऱ्याच्या गेट क्रमांक ८ मधून ८ हजार ८२५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या मुळे गंगामसला येथील गोदावरीच्या पात्रातील मोरेश्वर मंदिराच्या पायरीला पाणी लागले .
बंधारा परिसरात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४.३३ मिमी पावसाने हजेरी लावली . ढालेगाव बंधाऱ्यात तसेच परिसरात झालेल्या पावसामुळे बंध पाण्याची मोठी आवक झाली . त्यामुळे शुक्रवारी सकाळी बंधारा ९ ६ टक्के बंधाऱ्यातून भरल्याने बंध पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाथरी येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभागाकडून घेण्यात आला . त्यानुसार सकाळी ११.४५
मिनिटांनी या बंधाऱ्याच्या गेट क्रमांक ८ मधून ८ हजार ८२५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला .
बंधाऱ्यातील पाणी पातळी ८५ टक्क्यावर येईपर्यंत हा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिली .
दरम्यान , हे सर्व पाणी पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम निर्माणाधीन असल्याने मुदगल बंधाऱ्यात अडवले जाणार आहे , मुदगल बंधाऱ्यात यापूर्वीच २२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता त्यात आता भर पडणार असल्याने ढालेगाव बंधारा तुडुंब भरल्याने माजलगांव तालुक्यातील बोरगाव , आबेगांव , गंगामसला , आडुळा , सरवर पिंपळगांव , मोगरा , पाथरी शहरासह तालुक्यातील व माजलगांव तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे .
दुसऱ्या खतांची खरेदी केली तरच युरिया भेटन.!’श्री,चा अट्टाहास.?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});