ग्रामपंचायतीकडून आरोग्य केंद्रास वैद्यकीय साहित्याची भेट
परभणी – कोरोना या संसर्गजन्य आजाराची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पूर्णा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक त्या वैद्यकीय साहित्याची भेट देण्यात आली.
कोरोना आजाराच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून वैद्यकीय साहित्य भेट देऊन ताडकळस ग्रामपंचायतीने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसेच गावामध्ये वेळोवेळी क्लोरोक्वीनच्या फवारण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी पूर्णा पंचायत समितीचे सभापती अशोक बोकारे, जिल्हा परिषद सदस्य गजानन आंबोरे, गावचे सरपंच राजू पाटील आंबोरे, ग्रामसेवक केशव जवंजाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लहाने, वैद्यकीय अधिकारी श्री काचगुंडे, सौ आळणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.