ग्रामीण भागातील जीवन

0 528
       ग्रामीण भाग म्हणलं की गांव आलंच अनं गांव आलं की त्या गावाच्या आजोबाजूस असणारी रम्य वातावरण , नदी , मंग त्या नदी काठची झाड, थोडक्यात म्हंटल तर ग्रामीण भागातील सुंदर असं वातावरण .ग्रामीण भागातील मुख्य हा व्यवसाय शेती व शेतीपूरक जोडधंदा .ग्रामीण भागातील वातावरण म्हणलं की अगदी शुध्द असणारी हवा सर्वत्र शांतता कुठे ही जास्त प्रमाणन प्रदूषण नसणे असा हा ग्रामीण भाग.
     ग्रामीण भागत आज ही रूढी परंपरा टिकून आहेत विशेष म्हणजे सर्व चांगल्याच असणाऱ्या , (कारन पूर्वीच्या विचित्र असनाऱ्या घातक  रूढी परंपरा ग्रामीण भागात देखील नष्ट करण्यात आलेले आहेत ) तेथील संस्कृती
अजून ही कायम टिकून आहेत .ग्रामीण भागत आजही मानुसकी पहायला मिळते .एखादा कोणी अनोळखी व्यक्ती गावात आल्यास त्यानं एखाद्याचा पत्ता विचारल्यास गावातील मंडळी अथवा मुलं त्याला त्या व्यक्तीच्या घरापर्यंत नेहुन सोडतात ग्रामीण भागत अशी आपुलकी सर्वांना आसते.
    एकाद्याच सुखं दुःख असो तर त्या सर्वजन या भागात सहभागी होतात त्यांच्या सुखं दुखाच्या सोहळ्याला सर्व गांव त्यांच्या सोबत असतं .ग्रामीण भागातले वातावरण तर अगदी छान असं असते नेहमी त्यांत रमुन जावाव वाटत .पावसाळ्यात तर खूपच मौज असते पाऊस पडला की हिरवळ सगळीकडे दरवळते ओढे नदी नाले भरून वाहातात झाडाना एक तेज आलेले असतं अशा वातावरण जो आनंद आसतो तो काही वेगळाच म्हणता येइल .हिरव्या गार धाना नी भरलेल शेत त्या बरोबर  त्यात राबणारी व कष्टकरी शेतकरी , शेतमजूर. असं प्रसन्न वातावरण तिथं असतं मध्येच काम करता करता येणार पाऊस , त्यांसंगे गार गार वारा निसर्ग रम्य वातावरण तिथं असतं.
   ग्रामीण भागातील जीवनात जेवढं सुखं आहे मात्र दुःख ही तेवढंच आहे सर्व सुरळीत चालू असतांना पडणारा दुष्काळ, ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी योग्य त्या व योग्य वेळोवेळी उपलब्ध नसणाऱ्या सोयी सुविधा अश्या अनेक समस्याचा सामना ग्रामीण भागातील लोकांना करावा लागतो .या समस्या कंटाळून ग्रामीण भागात खुप मोठी समस्या उभवली आहे.शेतकऱ्यांची आत्महत्त्या इथं जेवढं सुखं आहे त्या पेक्षा ही भयंकर दुःख आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांना आहे वर्षांनी वर्षी निसर्गाच बदलत स्वरूप त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच होणारं लुसकान, कर्जाची दरी अश्या अनेक कारना मुळ इथल्या आनंदी जीवनाला झळ  लागली आहे.
अंगद दराडे 
माजलगाव बीड 
8668682620
error: Content is protected !!