घरकुल लाभार्थ्याचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी सरपंच संघटनेच्या बैठकीत ठराव

0 84

हिंगणघाट ,दि 23 (प्रतिनिधी)ः
प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड चे पात्र लाभार्थी यादीला निकषा नूसार मंजूरी द्यावी, आवास पलस आँनलाईन सर्वेक्षणात अपात्र दाखविलेल्या लाभार्थ्याचे नव्याने सर्वेक्षण करुन त्यात निकषा प्रमाणे पात्र लाभार्थ्यांना आँनलाईन पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट करण्याबाबत दि.26सप्टेंबर 2021च्या ग्रामसभेत ठराव घ्यावा, असा निर्णय सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप ठाकरे यांचे अध्यक्ष खाली घेण्यात आलेल्या तालुका सरपंच संघटने च्या बैठकीत घेण्यात आला.

या सभेत चर्चा करतांनी बाजार समिती संचालक व माजी जि प सदस्य  मधुसूदन हरणे यांनी ग्रामसभेत योजनेच्या निकषा प्रमाणे गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड केली, त्या यादीला तेव्हाच्या ग्रामसभेनी मंजूरी दिली होती.नंतर प्रशासन स्तरावरुन ऑनलाईन साफ्टवेअर सर्व्हक्षण करण्यात आले.या सर्व्हक्षणात प्रपत्र ड च्या यादीतील बहूतेक ग्रा.प.मध्ये 30 ते 50% टक्के पर्यंत लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले आहे. झालेल्या सर्व्हक्षणाची यादी जिल्हा ग्रामविकास यंत्रणे नी ग्रामसभेसमोर ठेवून, त्या अपात्र ठरलेल्या लाभार्थीचे आक्षेप नोंदवून, निकषा प्रमाणे त्याची चौकशी करून, त्यावर निर्णय देवून, त्या पात्र लाभार्थी यादी ला ग्रामसभेची मंजूरी घेणेआवश्यक असतानी, अशी कारवाही करण्यात आली नाही. आणी प्रशासना कडूण त्याबाबत ग्रा.प.ला कोणतीही माहीती देण्यात आली नाही.
त्यामूळे दि.26 सप्टेंबरच्या ग्रामसभेत पात्र लाभार्थ्याचे यादीला प्राधान्यक्रम ठरवून मंजूरी देने या प्रशासनाकडून आलेल्या विषयाला मंजूरी द्यावी. दूसरा विषय अपात्र लाभार्थ्यांचे सर्व्हक्षण करुन निकषा प्रमाणे पात्र ठरणार्‍या लाभार्थ्यांचा समावेश “पात्र लाभार्थी ‘ यादीत करण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा ठरविण्यात आले.सभेला तालूक्यातील 76 ग्रा.प.पैकी 55 ग्रा.प.चे सरपंच उपस्थित होते
बाजार समिती संचालक श्री मधुसुदन हरणे, विनोदभाऊ वानखेडे , राजुभाऊ मंगेकर, सुरेशभाऊ वैद्य, सरपंच श्री योगेश बोंडे,विजय बोरकर,नितीन वाघ,,अमोल बूरीले,नामदेव राऊत,अंकूश कामडी, पुरुषोत्तम वरटकर,देवीदास पाटील,दिलीप राऊत,राजू नगराळे,अनिल वागदे,शोभा कूडमते,दत्ता पांडे,ज्ञानेश्वर वागदे,प्रकाश उईके,दिगांबर खैरे,प्रविन कलवडे,बंडू तोडासे,मंदा धोटे,संजय गांधी,प्रशांत खाडेणकर,मगंला मून,रामेश्वर वासेकर,नारायन निहारे,चरनदास भोयर,गजानन गिरडकर,गिरधर सिडाम,आशिष राऊत,योगेश उमाटे,सुरेश वैध,एन डेहणे,नामदेव चांभारे,विलास मकरंदे,कविता वानखडे,शुभांगी काकडे,सुखदा हिवरकर,आशा थूल,शारदा झाडे,प्रतीमा परमोरे,योजना विरुटकर,अर्चना चेले,शिलाताई फूलझेले,ज्योती धोटे,ज्योती नाईक,कांता वैध,नंदा उमाटे,माधूरी बोभाटे, इत्यादी सरपंचानी चर्चेत भाग घेतलासभेचे संचालन श्री संदीप ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री अमोल बुरीले यांनी केले.

error: Content is protected !!