चांदवड तालुक्यात पेरण्या सुरू झाल्याने या वर्षीच्या खरिप हंगामास सुरूवात

0 89

चांदवड, प्रतिनिधी – दरवर्षी जुन महिन्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर शेतकरीवर्ग आपल्या शेतात खरिपातील पिकांची पेरणी करतात. अद्याप मान्सूनची हजेरी लागली नसली तरी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षीही अनेकांनी मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या ओलीच्या भरवशावर मान्सूनच्या पावसाची वाट न पाहता पेरण्या मात्र सुरू केल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या सहाय्याने तर काहींनी छोट्या टॅक्टरच्या सहाय्याने पेरण्या करत आहेत.

सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळामुळे थोडाफार पाऊस पडला. त्यानंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेही मोठ्या प्रमाणावर नाही परंतु थोडाफार जमिनीत ओल होईल इतका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती करून आता प्रत्यक्ष पेरण्या सुरू केल्या आहेत. खरिपातील मका, बाजरी, मुंग, भुईमूग, सोयाबीन, , तूर यासारख्या पिकांच्या पेरण्या शेतकरी करीत आहेत. तसेच भाजीपाल्याची लागवडही सुरू झाली आहे. त्यात टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मेथी, घेवडा यासारखा भाजीपाल्याची लागवड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी संकरित वाणाच्या बियाण्याना पसंती दिली आहे. पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडला आहे. विहिरींना अद्याप पाणी आलेले नाही. मात्र निसर्गाच्या भरवशावर शेतकरीवर्ग जोखीम पत्करून महागडी बियाणे व खते खरेदी करून शेतीसाठी वापरत आहेत. त्यासाठी उधार उसनवारी करुन भांडवल उपलब्ध केले जात आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज न मिळाल्याने शेतीसाठी भांडवलाची अडचण येत आहे. शासनाने शेतकऱ्यांना हंगामापूर्वी कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र आता हंगाम सुरू झाला असला तरी नविन कर्ज मिळत नसल्याने या हंगामातील भांडवलासाठी शेतकरी चिंताग्रस्त आहे. नवीन कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नांदेडमध्ये एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण २८६ झाले

हळद लागवड तंत्रज्ञान

matrimonial वेबसाईटवर जोडीदार शोधताय ? मग हे नक्की करा



error: Content is protected !!