जमीन सोडण्यासाठी चुलत्याने पुतण्याचे कपाळ फोडले
माजलगांंव, प्रतिनिधी – तालुक्यातील खेर्डा खू. येथे एकाच्या बापाची शेतजमीन असताना त्यात दुसऱ्या कुटुंबातील चुलत्याचा हिस्सा असल्याचा आरोप करत सदर जमीन सोडून देण्यासाठी चुलत्याने पुतण्या ला मारहाण करून कपाळ फोडले तर चुलता, चुलती ने पुतण्या च्या पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली.
या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खेर्डा खू. शिवारातील गटनं.१८८मध्ये बट ई ने केलेल्या शेतात २७मे रोजीच्या सकाळी १०वा.दरम्यान राम किसन सौंदर व त्यांची पत्नी जेवण करत असताना त्यांचा चुलता, चुलती नामे भास्कर कोंडीबा सौंदर , गिरजाबाई भास्कर सौंदर तेथे आले व राम ने स्वतः च्या शेतात उभारलेले पत्र्यांचे शेड काढण्यासाठी त्यांनी फार दिवसां पासुन सांगितले होते पण ते राम ने काढले नाही आणि बाप त्यांच्या कडेच खायला असुन सदरील जमीनीत हिस्सा आहे ,जमीन सोडून द्या म्हणत शीवीगाळ सुरू केली यावर शीव्या का देता म्हणताच भास्कर ने हातातील दगडाने मारहाण करून कपाळ फोडून गंभीर जखमी करून जीवेमारण्याची धमकी दिली. हे भाडंण सोडवण्यासाठी राम ची पत्नी समोर आली असता चुलता, चुलतीने शीवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद राम सौंदरने २९मे, दोन दिवसां नंतर माजलगांंव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने गुरनं.१४०/२०२० वरुन नमूद दोन्ही आरोपी विरोधात भादंवि. कलम ५०४,३२३, ३२४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.