जांभूळबेट संवर्धन मोहिमेस प्रारंभ,जांभळाच्या 200 रोपांची लागवड
पालम, दि. ६ (प्रतिनिधी): लोकसहभागातून पालम तालुक्यातील जांभूळबेट वाचविण्यासाठी कृषीभुषण कांतराव झरीकर व नांदेड येथील वृक्षमिञ ग्रुप ने पुढाकार घेत दि. ६ सप्टेंबर रोजी जांभूळबेटावर २०० जांभळाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यापूर्वी १४ जुन रोजी जांभूळबेटावर बैठक घेऊन दि.५ जुलै वृक्षारोपणाची तारिख निच्चीत केली होती. पण या तारखेला परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला होता .
पालम येथे सकाळी कृषीभुषण कांतराव देशमुख यांच्या हस्ते जांभूळबेट या दिशादर्शक फलकाचे पालम येथे अनावरण करून जांभूळबेट वृक्षारोपणाला सुरुवात झाली.या जांभूळबेट संवर्धन मोहिमेत कांतराव झरीकर व नांदेड येथील वृक्षमिञ ग्रुपच्या आवाहनला पालम तालुक्यातील जनतेने उत्सुर्फ सहभाग नोंदवला. दि.६ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जांभूळबेटावर जाभळाचे झाडं लावून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कांतराव देशमुख झरीकर व नांदेड येथील वृक्षमिञ ग्रुपच्या सभासदासोबत बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मणराव गोळेगावकर, डाॅ. निलेश दळवे, मारोतराव शिंदे, रामप्रसाद कदम,घोडा सोमेश्वर ग्रामपंचायतचे उपसरपंच राम कदम,विजयकुमार शिंदे व तालुक्यातील वृक्षमिञ हजर होते.