जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कोरोना ग्रस्तांसाठी दिले एक कोटी रुपये

0 107

परभणी – सद्यपरिस्थिती मध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने महाराष्ट्रा बरोबर सबंध जगभर थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार व्हावा आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून परभणी जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे सुमारे एक कोटी एक लक्ष रुपये एवढे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दिले आहे.

दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या उपस्थितीत परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना पहिल्या टप्प्यात रुपये 91 लाख 67 हजार 364 एवढा आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये 9 लाख 32 हजार 636 असा एकूण एक कोटी एक लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला. कोरोनाग्रस्तांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करणारी परभणी जिल्हा परिषद ही सद्यस्थितीत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.

तसेच परभणी जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वइच्छेने 750 अन्नधान्य संच, 150 आरोग्य संचाचे वाटप केले आहे.

कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईक यांना जीवनावश्यक वस्तू व दैनंदिन जीवनाचे वाटप करणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सद्यस्थितीत सुरू आहे.

जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना मदत निधी देतेवेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!