जि.प.प्रा.शा. सुराळा शाळेच्या शिक्षकांनी घेतला Whats app च्या माध्यमातून अभ्यास
वैजापूर, प्रतिनिधी – देशातील कोरोनाच्या थैमानामुळे गेल्या १५ मार्चपासून राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत.परंतु सुराळा शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठ्या शैक्षणिक खंडामुळे नुकसान होऊ नये म्हणून या संकटावर मात करण्यासाठी २० मार्च पासून ते शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल संपेपर्यंत आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे व्हाट्सएपच्या ग्रुप करून नियामितपणे अभ्यास दिला व पूर्ण करवून घेतला.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पानपाटिल पी डी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.शालेय सर्व विद्यार्थी व पालक यांनी या ऑनलाइन अभ्यासास उदंड प्रतिसाद दिला.
या उपक्रमास शिक्षक गणेश पगारे,राजू जगताप,सुनंदा बनसोडे,शांता मगर,वसुंधरा देवरे,दिपक पवार व रवीन्द्र साठे यांनी यशस्वी केले.