टाकरवण परिसरात यूरियासह इतर खताचा तुटवडा, पिके पिवळी पडु लागली युरीया मिळेना शेतकरी अडचनीत
माजलगांव,(प्रतिनिधी):- टाकरवण परीसरात युर्या सह इतर खताचा तुटवडा झाल्याने शेतकयांना खत मिळने अवघड झाले आहे.परीसरात पेरण्या उरकल्या आहेत.पीके जोमात डौलत आहेत.पीकांना खताची मात्रा देने गरजेचे आहे.त्यातच खताचा तुटवडा झाल्याने कृषी दुकाना शोधुनही टाकरवण परीसरातील शेतकयांना खत मिळत नसल्याने शेतकरी आडचनीत सापडला आहे . तरी कृषी विभाग व प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालन्याची मागनी शेतकऱ्यांकडुन होत आहे .
आतीवृष्टी सह कोरोनाच्या संकटाला सावरुन शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या वरुणराजाने वेळेवर हजेरी लावल्याने पिके जोमात आली.परीसरात आती पाऊस झाल्याने काही शेतातील पीके पिवळी पडु लागली पिक वाडी सह पिवळी पडलेली पिके वाचवन्यासाठी पिकांना युर्या व इतर खताची मात्र देन्याची गरज आहे.
गरजे वेळीच युर्या व इतर खताचा तुटवडा झाल्याने पिके आडचनीत आले आहेत.टाकरवन परीसरातील सर्व कृषी दुकानावर जाऊन ही शेतकऱ्यांना युर्या खत मिळत नाही त्याच बरोबर इतर खतेही मिळने अवघड झाल्याने शेतकरी आडचनीत सापडले आहेत.तरी कृषीविभागाने या प्रर्शनाकडे लक्ष द्यावे असी मागनी शेतकऱ्यांतुन होत आहे .