डिग्रस बंधाऱ्यातून दहा दशलक्ष घनमीटरच्यावर पाणी सोडू नका-आ.डॉ. रत्नाकर गुट्टे
-पंचेविस दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यास अनेक गावात पाणी टंचाईची शक्यता
-बागायती पिकाची होणार मोठे नुकसान
पालम, प्रतिनिधी – तालुक्यातील डिग्रस उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून सध्या 37 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी बंधाऱ्यात 25 दशलक्ष घनमीटर पाणी साठा सोडण्याची प्रशासनाने तयारी केली असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई व बागायती पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पालम पूर्णा तालुक्यातील बागायती पिकाच्या विचार करता विष्णुपुरी बंधाऱ्यात दहा दशलक्ष पाणी साठा सोडण्यात यावा अशी मागणी गंगाखेड मतदार संघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
27 एप्रिल रोजी पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे डिग्रस बंधाऱ्यातून 25 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडल्यास केवळ बंधाऱ्यात 12 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहणार आहे त्यामुळे गोदा काठावरील बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे डिग्रस बंधाऱ्यातून अनेक गावात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केलेला आहे जर बंधाऱ्यातून 25 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडल्यास बंधार्यात पाणी साठा तळाला जानार असुन त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे त्यामुळे डिगस बंधाऱ्यातून दहा दशलक्ष घनमीटरच पाणीसाठा सोडण्यात यावा व पालम पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी पुरेल