डॉ.शाम काळे यांनी यशस्वीपणे पार पाडली गुंतागुंतीची प्रसुती

0 96

टाळाबंदीतही बजावली आपली वैद्यकीय अत्यावश्यक सेवा
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळाबंदीतही आपली वैद्यकीय अत्यावश्यक सेवा बजावत सर्व दक्षता घेऊन एका 22 वर्षीय महिलेची गुंतागुंतीची असलेली प्रसूती येथील डॉ.शाम काळे यांनी काळे हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मध्ये केली. विशेष म्हणजे या प्रसुतीतगरोदर मातेने सुदृढ दोन बालकांना जन्म दिला आहे.जुळ्या शिशुंची व मातेची प्रकृती उत्तम असून या तिघांना 27 एप्रिल ला दवाखान्यातून ‘डिस्चार्ज ‘ देण्यात येणार आहे
येथील प्रसूती स्त्रीरोग ,वंधत्व तज्ञ लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ.शाम काळे यांच्याकडे मूलबाळ होत नाही म्हणून पंधरा महिन्यापूर्वी मांडेखेल येथील एक विवाहित जोडपे उपचारासाठी आले होते .दोघांची तपासणी केली,महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आकार बदललेला होता अशा परिस्थितीत डॉ.काळे यांनी योग्य त्या वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार सुरू केले व ऑगस्टमध्ये महिलेस गर्भधारणा झाली . सोनोग्रफीत महिलेस जुळे असल्याचे निदर्शनास आल्याने पोटातील बाळांची विशेष काळजी घेत डॉ. काळे यांनी उपचार केले .डिसेंबर महिन्यात गर्भ पिशवीला टाका दिला व महिन्याच्या महिन्याला गरोदर मातेची तपासणी केली .नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर 20 एप्रिल रोजी महिलेची प्रसुती झाली .महिलेच्या पोटात एक बाळ पायाकडून तर एक डोक्याकडून होते आणि मातेचा रक्तदाब नियंत्रनात नव्हता. रक्तदाब नियंत्रणात आणून गरोदर मातेचे यशस्वी सिझरिंग करून प्रसुती करण्यात आली.महिलेने दोन सुदृढ मुलांना जन्माला दिला आहे. त्यांची तब्येत उत्तम आहे.डॉ श्याम काळे यांनी गुंतागुंतीची असलेली ही प्रसुती यशस्वी केली व महिलेला आधार दिला. या उपचारासाठी श्याम काळे यांना भूल तज्ञ एल डी लोहिया, बालरोग तज्ञ डॉक्टर अजित केंद्रे , काळे हॉस्पिटल चे कर्मचारी वैजनाथ भंडारे,, वर्षा शिंदे मीना गडदे व वैजयंता सुरवसे यांनी सहकार्य केले, विशेष म्हणजे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व दक्षता घेऊन महिलेची प्रसुती करण्यात आली. कपड्यांचे इन्फेक्शन टाळण्यासाठी डॉ श्याम काळे यांनी स्वतःकडील बेबी ड्रेस किटही बाळांना दिले आहे, माता व जुळ्याची प्रकृती छान असून शाम काळे यांचे मांडेखेल येथील सर्वसामान्य कुटुंबातील नेमाने परिवार व आचार्य टाकळी येथील महिलेच्यामाहेर च्या लोकांनाही ऋण व्यक्त केले.

काळे हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होममध्ये एक विलगीकरण कक्ष….
परळी येथील काळे हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मध्ये हँड सॅनिटाइजरचा वापर केला जात आहे.दररोज सोडियम हायपोक्लोराईड द्वारे स्वच्छता केली जात आहे तसेच या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विनंतीवरून कोरोना पार्श्वभूमीवर विलगीकरण साठी एक कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे त्यात तीन बेडची सोय आहे अशी माहिती डॉक्टर श्याम काळे यांनी दिली.

error: Content is protected !!