WordPress database error: [Disk full (/tmp/#sql-temptable-82db-734f00-226e5.MAI); waiting for someone to free some space... (errno: 28 "No space left on device")]
SHOW FULL COLUMNS FROM `wp_zh06kdxwfh_options`

तब्बल १७ वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे आभार – शब्दराज

तब्बल १७ वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे आभार

जयंतरावांनीही चांगल्या कामगिरीबाबत त्यांचा केला सत्कार

0 66

 

 

परभणी – पाथरी दि. २४ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना तब्बल १७ वर्षांनंतर मंत्री जयंतराव पाटील यांचे आभार मानण्याची संधी मिळाली आहे.

परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पाथरी येथील आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी २००४ साली पाथरी पंचायत समितीचे सभापती असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री असताना जयंतरावांकडे सभापतींना वाढीव मानधन मिळावे तसेच वाहतुकीसाठी वाहन मिळावे अशी मागणी एका कार्यक्रमात केली होती असा किस्सा सांगितला. तेव्हा जयंतराव पाटील यांनी ती मागणी तात्काळ मान्य करत सभापतींचे मानधन ३ हजारांवरून १२ हजार इतके करण्याची घोषणा केलीच शिवाय जयंतराव पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या गोष्टीला १७ वर्षे उलटली असून आज जयंतराव पाटील पाथरीत आले असता पाथरीचे तालुकाध्यक्ष या नात्याने एकनाथ शिंदे यांना आढावा बैठकीनिमित्ताने बोलण्याची संधी मिळाली आणि १७ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांनी मंत्री जयंतराव पाटील यांचे आभार मानले.

चांगली कामगिरी केल्याबद्दल जयंत पाटील केला सत्कार…
दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी जयंतराव पाटील मोठे कष्ट घेत आहेत. पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी आपल्या तालुक्यात ८० टक्के बुथ कमिट्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कारही यावेळी केला.

error: Content is protected !!