..तर, सरकारी शाळांपुढे प्रवेशाचे ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड- कोळी

0 82

 

कोपरगाव- शाळेतील भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास सरकारी शाळांत प्रवेशासाठी रांगा लागतील असा आशावाद राज्य शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य अर्जून कोळी यांनी व्यक्त केला. कोपरगाव नगरपालिका शिक्षकांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा ‘कोळी पॅटर्न’ उपस्थित शिक्षकांसमोर उलगडला.

महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी पटसंख्या असलेल्या कराड शाळा नं.3 चे प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. सरकारी शाळांना पटसंख्येअभावी उतरती कळा लागलेली असताना कोळी यांच्या नेतृत्वाखालील कराड नगरपालिका शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागते. केंद्रीय शैक्षणिक धोरण निर्मिती समितीवरील राज्यातील एकमेव सदस्य आहेत.

यावेळी बोलताना कोळी यांनी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच्या विविध उपक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन केले. शाळेतील उपक्रम ,गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शिक्षकांची भूमिका याविषयी संवाद साधला. या कार्यक्रमावेळी सुनिल रहाणे, भरत आगळे, कल्पना निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास माळी,अरुण पगारे,सनी गायकर,गोपाल कोळी ,अमोल कडू,अमित पराई,शिरसाठ सर,आरती कोरडकर ,सविता साळुंके ,नसरीन ईनामदार यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी तर आभार सुनिता इंगळे यांनी मानले.

प्रयोगशील शिक्षणाचा ‘कोळी पॅटर्न’:

केंद्रीय अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा सर्वाधिक आहे. मात्र, गुणवत्तापूर्ण शिक्षणात सातत्यामुळे कराड नं. 3 शाळा सर्वाधिक पटसंख्येची शाळा गणली जाते. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी तब्बल 1100 अर्ज आले होते. अडीच हजार पटसंख्य़ेची राज्यातील एकमेव शाळा आहे. मुख्याध्यापक कोळी यांनी विविध शैक्षणिक प्रयोगातून शाळेचा आलेख उंचावला आहे. शैक्षणिक योगदानासाठी राज्य सरकारने आदर्श शिक्षण पुरस्काराने गौरविले आहे. शैक्षणिक प्रयोगाच्या अभ्यासासाठी सिंगापूर, थायलंड दौऱ्यात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!