तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर

0 118

गंगापूर, सचिन कुरुंद – कोरोना संसर्ग पुन्हा एकदा जोमाने पसरू लागला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तहसीलदार व जिल्हा प्रशासनाने पूर्णतः लॉकडाऊन न करता अंशतः लॉकडाऊन ची घोषणा केली.मात्र नागरिकांकडून अजूनही कोरोना नियमाचे पालन केले जात नसल्याने तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई केली.

गंगापूर शहरात कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या वर नागरिकांना दंडात्मक कारवाई केली. गंगापूर शहरात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क दुचाकीवरून फिरणाऱ्या नागरिकांवर तहसीलदार अविनाश शिंगटे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे पोलीस उपनिरीक्षक औटी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करून १ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता प्रशासनाने ११मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून प्रशासनाकडून बाजारपेठांमध्ये काही नियम लावले आहे. या नियमाचे पालन नागरिकांकडून होते की नाही हे पाहण्यासाठी गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे पोलीस उपनिरीक्षक औटी तलाठी नागडे वरिष्ठ लिपिक सलीम जहागिरदार, नारळे, सुधीर खाजेकर, बबलू खाजेकर, राहुल खाजेकर, भाना खाजेकर,अरुण कसबे, चंपालाल राजपूत सह कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणार्‍यावर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या कारवाई करत तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी आपला मोर्चा बँकेत वळवला व विनामास्क कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दंड केले. नंतर दुकानात जाऊन प्रशासनाने लावलेला नियमाचे पालन दुकानदार व्यापारी नागरिक मास्कचा वापर करतात की नाही याची पाहणी करून विनामास्क धारकांवर कारवाई केली.

error: Content is protected !!