तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे चोवीस गावांतील दोन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
माजलगांव ,प्रतिनिधी:- माजलगांव , पाथरी या दोन तालुक्यांतील चोवीस गावांतील शेती सिंचनाखाली येणार असून या गावांसाठी वरदान ठरणाऱ्या तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असल्याने तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी या बंधाऱ्यात पाणी अडणार आहे .
मागील १४ वर्षांपासून तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरू होते . वास्तविक पाहता या बंधाऱ्याचे काम मागील वर्षीच्या जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे संबंधित अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिलेले होते . कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे , तर कधी निधीअभावी या बंधाऱ्याचे काम चालू – बंद अवस्थेत होते .
आता रखडत पडलेल्या या बंधाऱ्याला मूर्त स्वरूप आले आहे . या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडणार असल्याने दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे . परिसरातील गावातील शेतकऱ्यांना हा तारूगव्हाणचा बंधारा वरदान ठरणार आहे .
या गावांना मिळणार पाण्याचा लाभ मोगरा , डाके पिंपरी , शु . लिमगाव , पोहनेर , डिग्रस , खतगव्हाण , सोन्नाथडी , गुंजथडी , सुरूमगाव , गंगामसला यासह तालुक्यातील जवळपास चोवीस गावांना या बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे . तालुक्यातील एक हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होण्यास मदत देखील होणार आहे ,तर या भागात आता ऊसलागवडही वाढणार आहे .
“तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी अडणार आहे . आमदार प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले आहे . परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा बंधारा वरदान ठरणार आहे . तालुक्यातील एक हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन होणार आहे . -भानुदास डक.
परवानगी गावात ; सेवाकेंद्र थाटले जाते बँक परिसरात ग्रामस्थांना सुविधा मिळेना
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});