तुफान हाणामारीत ४ गंभीर जखमी; परस्परविरोधी फिर्यादीत ६ जणांवर गुन्हे दाखल
माजलगांव, प्रतिनिधी – तालुक्यातील आनंदगाव शिवारात दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत चार गंभीर जखमी झाले तर परस्परविरोधात दिलेल्या फिर्यादी वरुन सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेची अधिकृतपणे मिळालेली माहिती अशी की, माजलगांव तालुक्यातील हनुमान नगर तांडा तहत निपाणी टाकळी येथील सर्जेराव चव्हाण आणि माणिक चव्हाण यांच्या शेतजमिनी शेजारच्या आनंदगाव शिवारात आहेत. १६एप्रिल गुरुवार रोजीच्या दुपारी १ते १:३०वा.सुमारास सर्जेराव चव्हाण व त्यांची दोन मुले स्वतः च्या शेतात ऊसाची खुरपणी करीत असताना माणिक फुलसिंग चव्हाण हे त्यांच्या दोन मुलां सोबत तेथे आले व सर्जेराव ची शेळी त्यांच्या शेतात कशी आली. म्हणून हुज्जत घालत भाऊसाहेब माणिक चव्हाणने लक्ष्मण सर्जेराव चव्हाण चे हात मागे ओढून शीवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर माणिक चव्हाण ने हातातील लोखंडी कोयता लक्ष्मण चव्हाण च्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर राहूल माणिक चव्हाण ने रोहीदास सर्जेराव चव्हाण च्या डाव्या हातावर लोखंडी अँगल ने वार करत हात फ्रक्चर करून गंभीर जखमी केले. अशी फिर्याद लक्ष्मण चव्हाण याने २२एप्रिल बुधवार रोजी दिल्याने माणिक, राहूल, भाऊसाहेब चव्हाण या आरोपी विरोधात गु.र.नं.८८/२०२० वरुन भादंवि. कलम ३२५,३२६, ५०४,५०६,३४ अन्वये दिंद्रुड पो.ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा तपास पो.हे.काँ. चौरे करत आहेत. दुसरी फिर्याद राहूल माणिक चव्हाण ने दिली असुन यात नमूद करण्यात आले आहे की, १६एप्रिल गुरुवार रोजी च्या दुपारी २वा. सुमारास ते व भाऊसाहेब चव्हाण त्यांच्या शेतातील कोठ्यात आराम करत असताना सर्जेराव फुलसिंग चव्हाण त्यांची मुले लक्ष्मण व रोहीदास चव्हाण यांना घेऊन तिथे आले व बैलाने ऊस खालल्याचे कारणावरून शीवीगाळ करत तिघांनी संगनमताने हातातील काठीने राहूलच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारदेऊन नस तुटून गंभीर जखमी केले. तर भाऊसाहेब चव्हाणच्या उजव्या हातावर काठी जबर मारहाण करून हात फ्रक्चर केला. अशी फिर्याद २२एप्रिल बुधवार रोजी राहूलने दिल्याने गु.र.नं.९०/२०२० वरुण नमूद आरोपी विरोधात भादंवि. कलम ३२४,३२५,५०४,५०६, ३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा तपास पोउपनि. नाचण करत आहेत.