तुर पिकांचा विमा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करा – बाबासाहेब वाघ
वैजापुर ,प्रतिनिधी- तुर या पिकाचा पिक विमा लवकरात लवकर जमा करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा लोक हक्क अभियान महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब वाघ यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सविस्तर माहिती अशी की,खरिप हंगाम 2019 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुर पिकांचा पिक विमा भरला होता.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने अन बिड जिल्ह्यामध्ये एक महिना अगोदरच पिक विमा मंजुर केला आहे तरी चौकशी व्हावी व आठ दिवसाच्या आत पिक विमा लवकरात लवकर जमा करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडू असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब वाघ,जिवन पठारे,प्रकाश वाघ,नानासाहेब घोडे, संजय त्रिभुवन,गणेश धारबळे,हारून पठाण व पंकज मतसागर यांच्या सह्या आहेत.
नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्सचं प्रसारण बंद, हे आहे कारण
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});