दिंद्रुडच्या टपाल कार्यालयाचा अनागोंदी कारभार एक रुपयाचे रशीद तिकिट पाच रुपयांत

0 262

माजलगांव,प्रतिनिधी :- सध्या पिक लागवड व मशागतीचे दिवस आहेत . आगोदरच टाळेबंदीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची पिककर्जासाठी सगळीकडे पिळवणूक होताना दिसत आहे . यातच पिककर्जासाठी लागणारे एक रुपयाचे भारत सरकारचे रशीद तिकिट चक्क पाच रुपयांना विक्री होत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे .
तालुक्यातील दिंद्रुड हे धारूर व माजलगांव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे . विस ते पंचवीस गावातील नागरिक बँकेसह वेगवेगळ्या कामासाठी दिंद्रुड ला येत असतात .

शेतकऱ्यांना पिककर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करतांना नाकीनऊ येतात . त्यातच दिंद्रुडच्या टपाल कार्यालयात रशीद तिकीटांचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते . मात्र असे असतांना खाजगी दुकानदारांकडे हजारोंच्या संख्येत हेच तिकीट विकत कशी मिळतात हे गौडबंगाल आहे . सामान्य नागरिकांना खाजगी दुकानदार एक रुपयांच तिकिट चक्क पाच रुपयांत विक्री करत आहेत . डाक कर्मचाऱ्यांकडे तिकिट मागितली असता तिकीट संपली असुन तुम्ही खाजगी दुकानातून खरेदी करण्याचा अजब सल्ला दिला जात असल्याने काही शेतकऱ्यांनी सांगितले .

याबत वृत्तपत्र प्रतिनिधींनी टपाल कार्यालयाशी संपर्क केला असता गावातील पतसंस्था , मल्टिस्टेट यांना आम्ही शेकडोंच्या नगात तिकीट विक्री केली असुन कोवीडच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी मुळे तिकीटांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्व रशीद तिकिट संपली असल्याचे सांगण्यात आले . केंद्र सरकारच्या टपाल कार्यालयावर प्रशासनाने नियंत्रण ठेवत ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!