दिंद्रुड पोलीसांनी तेलगाव शिवारात पकडली देशी दारू
माजलगांव, प्रतिनिधी – दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव शिवारात अवैधरित्या विक्री करण्यात येणारी देशीदारू दिंद्रुड पोलीसांनी रविवारी पकडुन जप्त करून एका जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत.
यासंदर्भात दिंद्रुड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीसांना तेलगाव शिवारात एका पञ्याच्या शेडमध्ये अवैधरित्या देशी दारू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचे पीएसआय विजेंद्र नाचण, पीएसआय विठ्ठल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सायंकाळच्या वेळी मोठ्या शिताफीने देशी दारू असलेल्या पञ्याच्या शेडमध्ये छापा टाकुन देशी दारूचे २९९५२/- रुपये किंमतीचे १२ बाॅक्स जप्त केले. याबाबत पोलीसांनी समाधान गायकवाड यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अवैधरित्या दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, डीवायएसपी श्रीकांत ढिसले तसेच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे प्र. सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजेंद्र नाचण, पीएसआय विठ्ठल शिंदे यांच्यासह पो.काॅ. बदने, पो.काॅ. सरवदे, पो.काॅ. मुजमुले, चालक शेख आदिंनी ही कारवाई केली.