दीदी धन्यवाद.. माझ्या बायकोची व बाळाची तब्बेत चांगली आहे…
गुजरामध्ये अडकलेल्या घोडके दाम्पत्याला मेघनादीदींची मदत
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील निलेश घोडके हे आपल्या पत्नीसह गुजरातला कामाला गेले होते. परंतु ते लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकले व त्यांच्या गर्भवती पत्नीची डिलेवरीची वेळ जवळ आली. अशा कठीण प्रसंगी आ. मेघनादीदींमुळे सर्व मदत जागेवरच मिळाल्याने घोडके दाम्पत्यांनी त्यांचे आभार मानले.
जानेवारी महिण्यात कामानिमित्त गुजरात येथे गेलेल्या निलेश घोडके यांनी आपल्या प्रेगनेंन्ट असलेल्या पत्नीला वेळेवर गावी वापस येण्याच्या उद्देशाने आपल्या सोबतच घेऊन गेले. पत्नीच्या डिलेवरीची वेळ जवळ आली म्हणून परतिचे तिकिटही काढले. पण देशात अचानक लॉकडाउनची घोषना झाली. आहेत तिथेच थांबण्या शिवाय पर्याय नाही. इतक्या लांब कुणी नातेवाईकही नाही किंवा कोणी ओळखीचे नाही. सोबत काम करणारे सर्वसामान्य आपापल्या घरी गेले. अशा वेळी कुणी रूग्णालयातही भरती करून घेत नव्हते. तेव्हा गावकडच्यांनी आ. मेघना दीदी बोर्डिकर यांच्याशी संपर्क साधला आणि काही वेळातच घोडके दांपत्याला आहे तिथे सर्वोतपरी मदत मिळाली. सौ. घोडके यांची डिलेवरी व्यवस्थित झाली आई व बाळे दोघेही आता सुखरूप असल्याने समाधान व्यक्त होत आहे.