दुकानात पाणी शिरल्याने धान्य भिजले टाकरवणला व्यावसायिकांचे नुकसान , नालेसफाईकडे दुर्लक्ष
माजलगांव( प्रतिनिधी):- तालुक्यातील टाकरवण येथे गावातील नाल्यांमधील पाण्याची योग्य विल्हेवाट लावलेली नाही . बुधवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी गावातील दुकानांमध्ये शिरले . यामुळे रेशनचे धान्य मोठ्या प्रमाणावर भिजले असून इतर व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे . टाकरवण गावामध्ये सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावलेली नाही .
ग्रामपंचायतकडे निधी असतानाही काही ग्रामपंचायत सदस्यांच्या वादामुळे गावात पावसाळापूर्व स्वच्छता , नालेसफाईची कामे झालेली नाहीत . याचा मोठा फटका आता ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . बुधवारी रात्री टाकरवणसह परिसरात मुसळधार पाऊस झाला .
त्यामुळे रस्त्यावर पाणीचपाणी होते . नाल्यातील पाणी काही व्यावसायिकांच्या दुकानात गेले . यामुळे रेशनचे धान्य मोठ्या प्रमाणावर भिजल्याचे दुकानदार सोजर पटेकर यांनी सांगितले . या नुकसान झालेल्या मालाची पाहणी करण्यात येईल , असे तलाठी गंगाराम वडमारे म्हणाले .
तर , यासह इतर महा ई सेवा केंद्र व इतरही दुकानमध्ये पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे .
महासभेच्या वतीने पाच हजार घरात होणार होमिओपॅथी औषधी च वाटप
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});