दुसऱ्या खतांची खरेदी केली तरच युरिया भेटन.!’श्री,चा अट्टाहास.?
माजलगांव,प्रतिनिधी :- तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्गात खरीप असो की रब्बी हंगाम असो यातील पीकांच्या वाढीसाठी सेंद्रिय खतांच्या मात्रा पेक्षा रासायनिक खतांच्या तुलनेत युरिया ला अधिक पसंती देतात आणि याचाच गैरफायदा कृषी सेवा केंद्राचे मालक वर्षानुवर्षे घेत आहेत हे सर्व ज्ञात आहे.
पण सध्या च्या महामारीच्या रोगात बळीराजाने तमान बाळगता नेटाने खरीप हंगामातील पीकांची लागवड/पेरणी केली आहे आणि त्या पीकांच्या वाढीसाठी युरिया खतांची मागणी जास्त आहे हे लक्षात घेऊन युरिया उपलब्ध असतानाही त्याच्या खरेदी सोबत दुसऱ्या खतांची खरेदी केली तरच युरिया भेटन असा अट्टाहास तालुक्यातील तालुक्यातील तालखेड येथील ‘श्री,कृषी सेवाकेंद्राचे मालक-चालक करीत आहेत.
याबाबत तालखेड येथील शेतकरी कैलास दत्तात्रय मोरे, राजू जगताप यांनी तालुका कृषी अधिकारी यांना १३जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील सदरच्या कृषी सेवाकेंद्रा सह इतर दुकानात युरिया उपलब्ध आहे आणि तो खरेदी करताना मर्जीतील शेतकऱ्यांना दिला जात आहे पण सामान्य शेतकऱ्यांना विक्री करताना इतर खतांची खरेदी केली तरच दिल्या जात आहे.
यावर संबंधित दुकानाला पुरवठा करण्यात आलेल्या युरियाचा तपशील शेतकऱ्यांना देऊन त्या दुकानदारावर कारवाई करावी तसेच सामान्य शेतकऱ्यांना सदर खतांचा पुरवठा केला जावा.अशी मागणी करून असे झाले नाही तर तमाम शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.
कृषी सेवा केंद्र चालकांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करु नये. लिंकींगद्वारे खते विक्री करुनये.असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. जादा दराने खते विक्री करुनये.याप्रकरणी चौकशी करून तक्रारी मध्ये तथ्य आहे का हे पाहण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल.
शिवप्रसाद संगेकर. ता.कृषी अधिकारी, माजलगांव.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});